Sankashti Chaturthi 2023  Saam Tv
लाईफस्टाईल

Sankashti Chaturthi 2023: नोव्हेंबर महिन्यातील पहिली संकष्ट चतुर्थी कधी? श्रीगणेशाला असे करा प्रसन्न

Sankashti Chaturthi 2023 In November : यंदा संकष्टी चतुर्थीचा हा उपवास १ नोव्हेंबरला असणार आहे.

कोमल दामुद्रे

Sankashti Chaturthi Date :

संकष्टी चतुर्थी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा उपवास आहे. ही चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला साजरी केली जाते. आश्विन महिन्यातील चतुर्थीला वक्रतुंड संकष्टी चतुर्थी साजरी होणार आहे.

यंदा संकष्टी चतुर्थीचा हा उपवास १ नोव्हेंबरला असणार आहे. हिंदू धर्मात बुद्धी आणि ज्ञानाची देवता गणपतीला विशेष महत्त्व आहे. गणपतीला प्रत्येक कार्यात पहिला मान दिला जातो. प्रत्येक महिन्यात २ चतुर्थीचे व्रत केले जातात. विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भाविक सुख, शांती आणि समृद्धीसाठी श्री गणेशाची पूजा करतात. जाणून घेऊया संकष्टी चतुर्थीची तिथी, पूजा आणि पद्धत ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. संकष्टी चतुर्थी तिथी

हिंदू पंचागानुसार संकष्टी चतुर्थी तिथी ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री ९ वाजून ३१ मिनिटांनी सुरु होईल. तर दुसऱ्या दिवशी १ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री ९ वाजून १७ मिनिटांनी समाप्त होईल. परंतु, या संकष्टीचे व्रत हे बुधवारी १ नोव्हेंबरला केले जाणार आहे.

2. शुभ मुहूर्त

गणेश पूजनासाठी (Ganesh Pujan) शुभ मुहूर्त (Muhurt) हा सकाळी ७. ४० मिनिटांनी ते ९. ३१ मिनिटांपर्यंत असेल. तसेच सायंकाळी ७. १० मिनिटे ते ८. २० पर्यंत करु शकता.

3. संकष्टी चतुर्थीला करा हे उपाय

  • संकष्टी चतुर्थीला सर्वप्रथम आंघोळ करुन नवीन वस्त्र परिधान करावे. त्यानंतर गणेशाला सिंदूर लावून पूजा करावी. सिंदूर हे सुख आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते.

  • तसेच श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाला फुले, मोदक आणि गुळाचा नैवेद्य दाखवला जातो.

  • धन (Money) प्राप्तीसाठी संकष्टी चतुर्थीला गणेश स्तोत्राचे पठण करावे. तसेच श्रीगणेशाला जास्वंदीचे फुल आणि दुर्वा अर्पण करावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

General Knowledge: व्यक्तीच्या शिंकण्याचा वेग किती असतो?

Maharashtra Live News Update: पुण्यात भाजप आमदार, महापालिका आयुक्त आणि पोलिस उपायुक्तांचा रिक्षाने एकत्रित प्रवास

Ajit Pawar: महायुती सरकार धारावी पुनर्विकास करूनच दाखवणार- अजित पवार|VIDEO

शाहजहाँने दिल्लीमध्येच का बनवला लाल किल्ला?

Raigad News: दरडग्रस्तांचं पुनर्वसन रखडलं; 44 कुटुंबांचा स्वातंत्र्य दिनी आत्मदहनाचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT