New Tablets Launched Saam Tv
लाईफस्टाईल

New Tablets Launched : लाँग लास्टिंग बॅटरीसह खिशाला परवडणारे टॅबलेट लॉन्च, किंमत फक्त 13,000 रुपये

Shraddha Thik

Samsung New Tablets Launched :

सॅमसंगने आपले दोन नवीन टॅबलेट भारतीय बाजारात लॉन्च केले आहेत. Samsung Galaxy Tab A9 आणि Galaxy Tab A9 + अशी या टॅब्लेटची नावे आहेत. कंपनीने ते स्वस्त दरात लॉन्च केले आहेत आणि दोन्ही टॅब्लेटमध्ये वेगवेगळे प्रोसेसर दिले आहेत.

Samsung Galaxy Tab A9 आणि Tab A9 + सॅमसंगने दोन परवडणारे टॅबलेट भारतात लॉन्च (Launch) केले आहेत ज्याची किंमत, 12,999 रुपये आहे. त्यांची नावे Samsung Galaxy Tab A9 आणि Tab A9 + आहेत. या टॅब्लेटमध्ये मोठ्या स्क्रीनसह मीडियाटेक प्रोसेसर आहे आणि प्लस व्हेरियंटमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर आहे. याबद्दल तपशीलवार माहिती पाहूयात.

Samsung Galaxy Tab A9 आणि Tab A9 + च्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर त्याची सुरुवातीची किंमत 12999 रुपये आहे. टॅब A9 सिंगल स्टोरेज (Storage) आणि व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आला आहे, तर टॅब A9 + दोन स्टोरेज प्रकारांमध्ये सादर करण्यात आला आहे.

Samsung Galaxy Tab A9 Series किंमत

Samsung Galaxy Tab A9 4GB + 64GB स्टोरेज प्रकारात येतो. यात WiFi + LTE आणि WiFi कनेक्टिव्हिटी पर्याय आहेत. चला किंमत बघा.

Samsung Galaxy Tab A9 कॉन्फिगरेशन 4GB + 64GB, कनेक्टिव्हिटी LTE+wifi, किंमत 12,999

Samsung Galaxy Tab A9 कॉन्फिगरेशन 4GB + 64GB, कनेक्टिव्हिटी Wifi, किंमत 15,999

Samsung Galaxy Tab A9+ कॉन्फिगरेशन 4GB + 64GB, कनेक्टिव्हिटी 5G, किंमत 22,999

Samsung Galaxy Tab A9 + कॉन्फिगरेशन 8GB + 128GB, कनेक्टिव्हिटी Wifi, किंमत 20,999

Samsung Galaxy Tab A9+ स्पेसिफीकेशन

Samsung Galaxy Tab A9+ मध्ये 11 इंचाचा LCD डिस्प्ले आहे. यात WQXGA (1920 x 1200 पिक्सेल) रिझोल्यूशन होते. त्याचा रीफ्रेश दर 90Hz आहे. हा टॅबलेट Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर सह Adreno 619 GPU सह येतो. यात 4GB / 8GB रॅम आणि 64GB/128GB स्टोरेजचे पर्याय आहेत. हा फोन (Phone) Android 13 आधारित OneUI 5.1 वर काम करेल.

कॅमेरा सेटअप

Samsung Galaxy Tab A9+ मध्ये 5MP फ्रंट कॅमेरा आहे. 8 मेगापिक्सेलचा मागील कॅमेरा आहे. या टॅबलेटमध्ये 7040mAh बॅटरी आहे. यात AKG चा क्वाड स्पीकर सेटअप आहे. या टॅब्लेटचे वजन 510 ग्रॅम आहे.

Samsung Galaxy Tab A9 चे स्पेसिफीकेशन

Samsung Galaxy Tab A9 मध्ये 8.7-इंचाचा LCD डिस्प्ले आहे. यात WQXGA (800 1340 पिक्सेल) रिझोल्यूशन असेल. त्याचा रिफ्रेश दर 60Hz आहे.

प्रोसेसर आणि RAM

Samsung Galaxy Tab A9 मध्ये MediaTek Helio G99 प्रोसेसर वापरला गेला आहे, ज्यासोबत Mali G57 GPU उपलब्ध आहे. यात 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज असेल. हा टॅबलेट Android 13 आधारित OneUI 5.1 वर काम करतो.

Samsung Galaxy Tab A9 कॅमेरा सेटअप

Samsung Galaxy Tab A9 मध्ये 8MP रियर कॅमेरा आहे, तर सेल्फीसाठी 2MP कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. यात 5100mAh बॅटरी आणि USB टाइप-सी वापरण्यात आला आहे. त्याचे वजन 336 ग्रॅम आहे. सॅमसंगने या दोन्ही टॅब्लेटच्या रिटेल बॉक्समध्ये चार्जिंग अडॅप्टर दिलेले नाही....

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Festival: दिवाळीला दारात तेलाचा की तुपाचा दिवा लावावा?

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

SCROLL FOR NEXT