Samsung New Phone : सॅमसंगचा नवा फोन लवकरच होणार लाँच; 50MP ट्रिपल कॅमेरासह येणार बाजारात

Samsung Galaxy S23 FE : सॅमसंगचा नवीन फोन बाजारात लवकरच लाँच होणार आहे.
Samsung Galaxy S23 FE
Samsung Galaxy S23 FESaam Tv
Published On

Samsung Galaxy S23 FE Price And Features

स्मार्टफोनमध्ये सॅमसंग कंपनीचे नाव अग्रेसर आहे. सॅमसंग कंपनी नेहमी युजर्ससाठी नवीन फोन बाजारात लाँच करत असते. अशातच सॅमसंगचा नवीन फोन बाजारात लवकरच लाँच होणार आहे.

Samsung Galaxy S23 FE हा फोन लवकरच बाजारात लाँच होणार आहे. एका रिपोर्टमध्ये या फोनची किंमत समोर आली आहे. परंतु याबाबत कंपनीने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. सॅमसंगने वर्षाच्या सुरुवातीलाच Galaxy S23 सीरीज लाँच केली होती. आता या सीरीजमधील एक नवीन मॉडेल लवकरच बाजारात येणार आहे. या नवीन स्मार्टफोनचे नाव Galaxy S23 FE आहे.

Samsung Galaxy S23 FE
Meesho Recruitment: बेरोजगार तरुणांनो ही संधी चुकवू नका; मीशोमध्ये ५ लाखांहून जास्त जागांसाठी भरती

Samsung Galaxy S23 FE फोनबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. हा फोन पुढच्या महिन्यात लाँच केला जाणार आहे. कंपनीने यापूर्वी २०२२ मध्ये Galaxy S21 FE लाँच केला आहे. एका रिपोर्टनुसार, या फोनची अमेरिकन किंमत समोर आली आहे.

Samsung Galaxy S23 FE लीक झालेली किंमत

एका रिपोर्टनुसार, Samsung Galaxy S23 FE ची किंमत राज्यांनुसार बदलू शकते. या फोनची किंमत 599 डॉलरपासून सुरू होऊ शकते. हा फोन 8 GB रॅम आणि 128 स्टोरेजसह उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

या फोनची किंमत एवढी असल्यास अमेरिकन लोकांसाठी ही जबरदस्त डिल असू शकते. या फोनमध्ये 6.4 इंच AMOLED डिस्प्ले असण्याची अपेक्षा आहे. ज्यात फुल HD+ रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट असू शकतो.

Samsung Galaxy S23 कॅमेरा आणि बॅटरी

या नवीन फोनमध्ये मागील बाजूस 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता आहे. तर समोर 10MP सेल्फी शूटर असू शकतो. या फोनमध्ये 4,500mAh बॅटरी दिली जाईल. जी 25W चार्जिंग सपोर्टसह येईल. लीक झालेल्या माहितीनुसार, Samsung Galaxy S23 FE 4 ऑक्टोबरला लाँच होऊ शकतो.

Samsung Galaxy S23 FE
Parenting Tips : 6 महिन्याच्या बाळाला ही पोषणतत्त्वांनी भरलेली प्यूरी ठरेल बेस्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com