Meesho Recruitment: बेरोजगार तरुणांनो ही संधी चुकवू नका; मीशोमध्ये ५ लाखांहून जास्त जागांसाठी भरती

Job Vacancy In Meesho: गणेशोत्सवानंतर येणाऱ्या सणानिमित्त जवळपास पाच लाख हंगामी नोकऱ्या मीशो देत आहे.
Meesho Recruitment
Meesho RecruitmentSaam TV
Published On

Meesho Job Opportunities:

बेरोजगार असलेल्या तरुणांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. ऐन सणासुदीच्या काळात मीशोने नोकरीसाठी भरतीची मोठी घोषणा केलीये. या भरतीमध्ये लाखो तरुणांच्या हाताला रोजगार मिळणार आहे. (Latets Marathi News)

Meesho Recruitment
Job Scam: बाबो, हा तर सर्वात खतरनाक स्कॅम! एकाचवेळी 'ती' तब्बल १६ कंपन्यांमध्ये काम करायची, घरी बसून घेतला पगार; अखेर...

५ लाख पदांसाठी हंगामी नोकरी

अधिक माहिती अशी की, मीशो या कंपनीने आपल्या कामाचा आणि विक्रिचा गराडा पाहता ही भरती काढली आहे. होळीनंतरच सर्व सण उत्सवांना सुरुवात झालीये. आता गणेशोत्सवानंतर येणाऱ्या सणानिमित्त जवळपास पाच लाख हंगामी नोकऱ्या मीशो देत आहे.

५० टक्क्यांनी नोकर भरतीत वाढ

मीशोने स्वत: या बंपर भरतीची घोषणा केलीये. कंपनीने गेल्या वर्षीच्या तुलनेत ५० टक्क्यांनी नोकर भरतीत वाढ केलीये. मीशो कंपनी सणासुदीच्या हंगामासाठी ३ लाख हंगामी कामगारांना कामावर ठेवण्याचा अंदाज आहे. सोशल मीडियावर अॅमोझॉन ही सर्वांची विश्वासाची कंपनी असल्याचं दिसतं.

मीशोचे ८० टक्क्यांहून अधिक विक्रेते

मात्र अनेक सोशल मीडिया इंफ्लूएन्सर आपल्या प्रोडक्टमध्ये मीशो आणि विविध कंपन्यांची तुलना दाखवतात. तसेच ग्राहक देखील मीशोला जास्तीत जास्त पसंती देत आहेत. त्यामुळे ग्राहकांसाठी मीशो कंपनी येत्या काही दिवसांत आणखीन युनीक डिझाइन आणि युनीक कॅटेगरी तसेच नवे उत्पादने घेऊन येणार आहेत. मीशोचे ८० टक्क्यांहून अधिक विक्रेते आहेत.

अप्लाय कसं करायचं?

मीशो कंपनीत जर तुम्हाला नोकरी मिळवायची असेल तर तिथे अप्लाय कसं करायचं असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर मीशोमध्ये नोकरीसाठी अप्लाय करताना https://www.meesho.io/jobs या संकेत स्थळावर भेट द्या. पुढे तुम्हाला डाटा एन्ट्री, कस्टमर केअर तसेच अन्या ज्या पदासाठी अप्लाय करायचे आहे ते सिलेक्ट करा. पुढे विचारलेली माहिती व्यवस्थित भरा. त्यानंतर मुलाखत घेऊन तुमचे सिलेक्शन केले जाईल.

Meesho Recruitment
New Frontline Jobs Declined in India: देशात बेरोजगारांची संख्या वाढली, चिंताजनक आकडेवारी आली समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com