New Frontline Jobs Declined in India: देशात बेरोजगारांची संख्या वाढली, चिंताजनक आकडेवारी आली समोर

New Frontline Jobs Declined in India: चालू आर्थिक वर्षात नव्या नोकऱ्यांची निर्मिती १७.५ टक्क्यांनी घसरल्याने ६.६ दशलक्ष इतकीच नोकऱ्यांची निर्मिती झाली आहे, अशी माहिती 'बेटरप्लेस'ने याबाबत दिली आहे.
Maharashtra Government Jobs
Maharashtra Government Jobs Saam tv
Published On

Frontline Jobs Declined in India

कोरोना महामारीनंतर जगभरातील देशांसहित भारताच्या अर्थव्यवस्थेलाही धक्का बसला. कोरोना महामारीनंतर देशात अनेक आर्थिक चढ-उतार पाहायला मिळाले. मागील आर्थिक वर्षात ८ दशलक्ष नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या होत्या. मात्र, चालू आर्थिक वर्षात नव्या नोकऱ्यांची निर्मिती १७.५ टक्क्यांनी घसरल्याने ६.६ दशलक्ष इतकीच नोकऱ्यांची निर्मिती झाली आहे, अशी माहिती 'बेटरप्लेस'ने याबाबत दिली आहे. यामुळे देशात बेरोजगारांची संख्या वाढणार असल्याचे दिसून येत आहे. (Latest Marathi News)

ई-कॉमर्स, लॉजिस्टिक आणि मोबिलिटी या क्षेत्राची आकडेवारी 'बेटरप्लेस'कडे आली . या क्षेत्रातील एप्रिल २२ आणि मार्च २३ या दरम्यानच्या आकडेवारीवरून 'बेटरप्लेस'ने अहवाल सोमवारी जारी केला.

Maharashtra Government Jobs
Upcoming IPO List : कमाईची सुवर्णसंधी! या आठवड्यात 3 IPO मध्ये पैसे गुंतवून व्हा मालमाल

या अहवालात नवीन नोकऱ्यांमध्ये १७.५ टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले आहे. यामध्ये सेल्स, बिझनेस डेव्हलेपमेंट एक्स्युटिव्ह, कॉल सेंटर कर्मचारी,मार्केटिंग एक्स्युटिव्ह, साफसफाई आणि इतर नोकऱ्यांची घट झाली आहे.

कोरोना महामारीचा परिणाम ग्रामीण भागावर मोठा प्रमाणात झाला होता. तसेच अमेरिकेमधील मंदीचा आयटी क्षेत्रावर मोठा परिणाम झाला. त्यामुळे या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या खिशावरही मोठा परिणाम झाल्याचे समोर आले आहे.

तसेच या 'बेटरप्लेस'च्या अहवालात ई-कॉमर्सच्या मागणीतही ५२ टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले आहे. मात्र, लॉजिस्टिक्स आणि मोबिलिटी क्षेत्रात मोठ्या रोजगारांची संधी निर्माण झाल्याचेही समोर आले आहे.

Maharashtra Government Jobs
Money Double Scheme : PPF, म्युच्युअल फंड आणि बँक एफडीतून पैसे होतील डबल, कसे? जाणून घ्या सविस्तर

'आर्थिक अडचणीमुळे भारत आणि आग्नेय आशियातील उद्योग क्षेत्रातील नियुक्तीच्या पद्धतीवर पुन्हा विचार करण्यास भाग पाडले आहे, त्यामुळे यंदा फ्रंटलाइन कामगारांच्या मागणीत घट झाली आहे, अशी प्रतिक्रिया बेटरप्लेसचे सह-संस्थापक आणि ग्रुप सीईओ प्रवीण अग्रवाल यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com