Samsung Galaxy S23 FE 5G Price Saam TV
लाईफस्टाईल

Samsung Galaxy S23 FE 5G Price : OnePlusला टक्कर देण्यासाठी Samsung सज्ज! 50MP कॅमेरासह येणार बाजारात, किमत पाहा

Samsung Galaxy S23 FE 5G Features: Samsung Galaxy S23 FE 5G लवकरच बाजारात दाखल होणार आहे.

कोमल दामुद्रे

Samsung Galaxy S23 FE 5G Launch Date :

सप्टेंबर महिना सुरु झाला की, अनेक फोन बाजारात लॉन्च होतात. अशातच दक्षिण कोरीयन कंपनी Samsung लवकरच Oneplus ला टक्कर देणार आहे. Samsung Galaxy S23 FE 5G लवकरच बाजारात दाखल होणार आहे.

मागच्या वर्षी लॉन्च झालेल्या Galaxy S21 FE ची जागा घेऊ शकते. सॅमसंगने या वर्षी फेब्रुवारीमध्ये Galaxy S23, Galaxy S23+ आणि Galaxy S23 Ultra स्मार्टफोन लॉन्च केले आणि त्याची वाढती क्रेझ पाहायला मिळाली. लवकरच Samsung Galaxy S23 FE 5G लॉन्च होणार आहे.

ही कंपनी (Company) फॅन एडिशन असून त्याला FE मॉडेल म्हणता येईल. या फोनच्या लॉन्चिंगची अद्यापह कोणतीही माहिती मिळाली नाही. परंतु, फोनच्या किमतीबद्दल ऑनलाइन माहिती देण्यात आली आहे. यामध्ये 128GB आणि 256GB स्टोरेज मिळणार आहे.

NBT ने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार Galaxy S23 FE 5G च्या 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 54,999 रुपये असू शकते. तर 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 59,999 रुपये असू शकते. Samsung Galaxy S23 FE 5G ला कंपनीच्या फ्लॅगशिप सीरीजचा बजेट फोन म्हणता येईल.

तसेच फेब्रुवारी महिन्यात लॉन्च करण्यात आलेला Galaxy S23 ची किमत ही 74,999 इतकी होती तर Galaxy S23+ आणि Galaxy S23 Ultra ची सुरुवातीची किंमत साधारणत: 94,999 रुपये आणि 1,34,999 रुपये आहे. Galaxy च्या तीन्ही मॉडेल्ससाठी कस्टम Snapdragon 8 Gen 2 देण्यात आला आहे.

1. अपडेट काय आहे?

यात असणारे Snapdragon 8 Gen 1 SoC अमेरिकन प्रकारवर काम करु शकते. यामध्ये Samsung Galaxy S23 FE 5G गीकबेंचवर Exynos 2200 SoC सह मिळणार आहे. यामध्ये ब्लूटूथ SIG प्रमाणन साइटवर SM-S711U आणि SM-S711U1 या मॉडेल क्रमांकांसह मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार Galaxy S23 FE 5G मध्ये Android 13 दिला जाऊ शकतो. तसेच चार वर्षांसाठी ओएस अपडेट्स आणि ५ वर्षांसाठी सिक्युरिटी पॅच अपडेट्स मिळू शकते.

2. फीचर (Feature)

या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.4 इंच डायनॅमिक AMOLED डिस्प्ले असू शकतो. यात ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असण्याची अपेक्षा आहे. कॅमेराचा पहिला सेन्सर 50 मेगापिक्सेल, दुसरा 8 मेगापिक्सेल आणि तिसरा 12 मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा असेल. यात सेल्फीसाठी 10 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला जाऊ शकतो. यात 4500mAh बॅटरी दिली जाऊ शकते आणि ती वायर्ड चार्जिंग तसेच 25W वर वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंची ताकद वाढली! अपक्ष आमदारासाठी थेट हेलिकॉप्टरच पाठवलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: नव्या सरकारचा शपथविधी हा वानखेडे स्टेडियमवर होणार

Eknath Shinde Press Conference: साष्टांग दंडवत! शिंदे- फडणवीस- पवार लाडक्या मतदारांसमोर नतमस्तक; पाहा VIDEO

Amit Thackeray: मुंबईत राज ठाकरेंना धक्का, अमित ठाकरेंचा पराभव; उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराने मैदान मारलं

Maharashtra Politcs : सहानभुती संपली, मविआ हारली; आघाडीच्या पराभवाची कारणे काय? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT