Samantha Ruth Prabhu Fitness  Instagram
लाईफस्टाईल

Samantha Fitness Secret: समंथाने सांगितला फिटनेसचा राज, वजन वाढू नये म्हणून खाते 'हे' पदार्थ

samantha ruth prabhu: अभिनेत्री समंथा रुथ प्रभू तिच्या अभिनयामुळे आणि लूकमुळे चर्चेत असते. अलीकडेच, इंस्टाग्रामवर आस्क मी एनीथिंगमध्ये, तिने वजन न वाढण्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुप्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू तेलगू थ्रिलर चित्रपटांमुळे, तिच्या फॉटो शुटमुळे चाहत्यांच्या नेहमीच चर्चेत राहते. समंथा दिसायला सुंदर आणि एकदम फीट आहे. तिच्या फीटनेस बद्दल चाहते तिला नेहमीच प्रश्न विचारतात. तिने नुकत्याच केलेल्या स्किन-फीट कपड्यांच्या फोटोशुटमुळे चाहते घायाळ झाले होते.

तसेच समंथा तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नेहमीच सक्रीय असते. त्यात तिने इंस्टाग्राम अकाऊंटवर एक आस्क मी एनीथिंग सत्र केले, ज्यामध्ये चाहत्यांनी तिला विविध प्रकारचे प्रश्न विचारले. यातील एक प्रश्न तिच्या वजनाचा होता. त्यावर समंथा म्हणाली, 'मी सध्या एंटी-इंफ्लेमेटरी डाएटवर आहे, जो माझ्या आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे. तो डाएट फॉलो केला की, माझे वजन वाढत नाही. ' असी सिक्रेट टिप समंथाने चाहत्यांना दिली.

समंथा करते 'या' सिक्रेट पदार्थांचे सेवन

समंथा एंटी इंफ्लेमेटरी पद्धतीचा डाएट फॉलो करते. त्यात विविध बेरीजचे सेवन सेवन तिच्या डाएटमध्ये करत असते. यात भरपुर प्रमाणात आणि शरीरासाठी आवश्यक पोषक तत्वे असतात. त्याने अनेक आजारांपासून अलिप्त राहता येते. तुम्ही स्मुदीसोबत किंवा नाश्त्याला बेरीजचे सेवन करु शकता.

Writtern By: Sakshi Jadhav

Maharashtra Live News Update: भाजप-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार- मुरलीधर मोहोळ

Mangal-Budh Yuti: मंगळ-बुध ग्रहाची होणार महायुती; 'या' राशींची तिजोरी तुडुंब भरणार

Success Story: इंटरव्ह्यूआधी वडिलांचे निधन, आभाळाएवढं दुःख तरी मानली नाही हार; शुभम राय यांनी ६व्या प्रयत्नात क्रॅक केली MPPSC

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींना आज कामात अडथळे येतील; वाचा राशीभविष्य

https://saamtv.quintype.com/story/d86ac51e-b354-4ca2-8d75-93946c83e994

SCROLL FOR NEXT