सकाळची सुरुवात फ्रेश होऊन व्हावी, असे प्रत्येकालाच वाटते. पण जर सकाळच्या वेळी टॉयलेटमध्ये जाऊनही पोट साफ होत नसेल, तर दिवसभर चिडचिड आणि अस्वस्थता नक्कीच वाढते. हा त्रास अनेकांना रोजचाच वाटू लागतो. पण याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. तज्ज्ञ पोटविकार तज्ज्ञांनी (Gastroenterologist) यावर सोप्या शब्दात सल्ला दिला आहे.
सकाळी शौचास न होणे, शौचास त्रास होणे किंवा शौचाच्या वेळी जोर लावावा लागणे ही बद्धकोष्ठतेची लक्षणे असू शकतात. अनेक लोकांना पोट साफ न होण्याचा त्रास होतो. शौच साफ करण्यासाठी विविध औषधांचाही वापरही केला जातो. पण तरीही त्यांना या समस्येपासून सुटका मिळत नाही. प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी (हेपॅटोलॉजी) डॉ. अभिजीत रंजन यांनी यावर उपाय सांगितलाय.
डॉक्टर काय सांगतात?
पोटविकार तज्ज्ञांच्या (गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट) मते, सकाळी पोट साफ न होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. पण जेवणात फायबरची (तंतुमय पदार्थांची) कमतरता असणे. कमी पाणी पिणे. दिवसभरात शारीरिक हालचाल किंवा व्यायाम कमी असणे. अनियमित दिनचर्या या कारणामुळे पोट साफ होत नाही.
सकाळी पोट सहज साफ होण्यासाठी काय करावे?
सकाळी उठल्या उठल्या पाणी प्या
नाश्त्यानंतर टॉयलेटला जाण्याची सवय लावा
टॉयलेटला गेल्यावर खूप जोर देऊ नका आणि शरीराच्या नैसर्गिक संकेतांकडे दुर्लक्ष करू नका.
आहारात काय बदल करावेत?
फायबरयुक्त पदार्थ खा: आहारात पपई, पेरू, हिरव्या भाज्या, डाळी, ओट्स आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करा.
भरपूर पाणी प्या: दिवसभरात पुरेसे पाणी प्यायल्याने शौच मऊ होण्यास मदत होते.
रोज चाला: दररोज २० ते ३० मिनिटे नियमित चाला किंवा हलका व्यायाम करा.
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
बद्धकोष्ठता जर खूप दिवसांपासून असेल आणि घरगुती उपायांनी फरक पडत नसेल तर पचनसंस्थेच्या तज्ज्ञांकडे (Gastroenterologist) जाऊन नक्की दाखवा.
शौचातून रक्त पडणे. पोटात तीव्र वेदना किंवा कळा येणे. उलट्या होणे किंवा मळमळणे. पोट खूप फुगणे आणि शौच किंवा गॅस अजिबात पास न होणे ही लक्षणे दिसल्यास अजिबात वेळ न घालवता लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.