Stock Market Fall: रशिया- युक्रेन वादाचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम; Sensex 1000 अंकांनी खाली Saam Tv
लाईफस्टाईल

Stock Market Fall: रशिया- युक्रेन वादाचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम; Sensex 1000 अंकांनी खाली

शेअर मार्केटमध्ये अस्थितरता कायम असल्याचे सध्या दिसून येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शेअर मार्केटमध्ये (Share Market) अस्थितरता कायम असल्याचे सध्या दिसून येत आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात तणाव (Russia Ukraine) शिगेला पोहोचले आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर मार्केटवर (Indian Share Market) होत असलेले देखील बघायला मिळत आहे. आज भारतीय (Indian) शेअर मार्केट उघडताच मोठी घसरण बघायला मिळाली आहे. भारतीय बाजार मार्केटचा बाजार उघडताच सेन्सेक्स (Sensex) १००० पॉईंटसने तर निफ्टी (Nifty) २९० पॉईंट्सने घसरण झाल्याचे बघायला मिळाले आहे. (Russia Ukraine dispute affects Indian stock market)

हे देखील पहा-

रशिया आणि युक्रेन (Ukraine) यांच्यात तणाव कायम आहे. त्यामध्येच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेन मधील २ प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आहे. यामुळे याचा परिणाम संपूर्ण आंतरराष्ट्रीय (International) पातळीवर दिसून येत आहेत. याचाच एक भाग म्हणून भारतीय मार्केटमध्ये बाजारात मोठी घसरण झाल्याचे बघायला मिळत आहे. रशिया- युक्रेन तणावाच्या दरम्यान निर्माण झालेल्या युद्धसदृश्य परिस्थितीने मंगळवारी सलग पाचव्या दिवशी भारतीय शेअर बाजारावर त्याचा परिणाम दिसून आला आहे.

बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) आणि एनएसई निफ्टी (NSE Nifty) या दोन्हीमध्ये प्री मार्केट ओपनिंगमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होणार असल्याचे संकेत देत होते. प्री मार्केट ओपनिंग सेशनमध्ये सेन्सेक्स १२०० पॉईंट्सने खाली दाखवत होते आणि जेव्हा मार्केट ओपन झाले होते. तेव्हा सेन्सेक्सची सुरुवात ९९९ पॉईंट्सने घसरण झाली होती. पुढील काही मिनिटामध्ये शेअर मार्केटमध्ये खूपच वोलॅटिलिटी दिसून आली आहे. काही वेळातच सेन्सेक्सने १५० पॉईंटसने रिकवरी सुद्धा केली आहे. पण सकाळी ९.२० वाजता सेन्सेक्स जवळपास ९९० पॉईंट्सने सुरू झाला आहे.

यानंतर ५६,७०० पॉईंट्सवर सेन्सेक्स ट्रेंड करत आहे. याप्रमाणे निफ्टीची सुरवात देखील ३०० पॉईंट्सहून अधिक पॉईंट्सने घसरणीसह झाली आहे. यामुळे निफ्टी १७ हजारांच्या खाली सध्या ट्रेंड करत आहे.याअगोदर सोमवारी सलग चौथ्या दिवशी भारतीय शेअर मार्केटमध्ये घसरण दिसून आली होती. मागील आठवड्यामध्ये ५ पैकी ४ दिवस शेअर मार्केटची सुरुवात रेड कॅन्डलने झाली होती. सोमवारी मार्केट बंद झाले तेव्हा सेन्सेक्स १४९.३८ पॉईंट्सने खाली आली आहे. ५७,६८३.५९ अंकांवर होता. तर निफ्टीमध्ये ६९.६५ अंकांनी खाली आला आहे. 1१७,२०६.६५ अंकांवर बंद झाला आहे. याअगोदर शुक्रवारी सेन्सेक्स ५९.०४ पॉईंट्सने खाली आला आहे. ५७,८३२.९७ पॉईंट्सने तर एनएसई निफ्टी २८.३० पॉईंट्सने घसरणीबरोबरच १७,२७६.३० पॉईंट्सवर बंद झाला होता.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार मलब्याखाली दबले

SCROLL FOR NEXT