Royal Enfield Himalayan 450 Launch In India Saam Tv
लाईफस्टाईल

दमदार इंजिन, अ‍ॅडाव्हान्स फीचर्ससह Royal Enfield Himalayan 450 बाजारात लाँच; जाणून घ्या किंमत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Royal Enfield Himalayan 450 Features And Price:

रॉयल एन्फिल्ड कंपनी ही बाईकच्या आकर्षक लूकसाठी ओळखली जाते. कंपनी नेहमीच ग्राहकांसाठी नवीन बाईक लाँच करत असते. कंपनीने २४ ऑक्टोबरला लाँच केली आहे. रॉयल एन्फिल्ड हिमालयन बाईकचे नेक्स्ट जनरेशन मॉडेल आता लाँच करण्यात आले आहे. कंपनीने Royal Enfield Himalayan 450 बाईक वेगवेगळ्या रंगामध्ये सादर केली आहे.

किंमत (Price)

एका वृत्तानुसार, रॉयल एन्फिल्डची (Royal Enfield)ही बाईक जबरदस्त लूक आणि नवीन फिचर्ससह बाजारात लाँच झाली आहे. बाईकची किंमत २.६९ लाख रुपये आहे. ही बाईक वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये लाँच केली असून टॉप मॉडेलची किंमत २.८४ लाख रुपये आहे. ही किंमत ३१ डिसेंबरपर्यंत वॅलिड आहे.

इंजिन (Engine)

Royal Enfield Himalayan 450 बाईकमध्ये 452 सीसी लिक्विड-कूल्ड DOHC सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आला आहे. बाईकची इंधनाची टाकी १७ लिटर आहे. हे इंजिन 8,000 rpm वर 39.5 hp ची पॉवर आणि 5,500 rpm वर 40 NM चे पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन असिस्ट आणि स्लिपर क्लचसह 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

फिचर्स

Royal Enfield 450 मध्ये 4 इंचचा सर्क्युलर टीएफटी इंस्ट्रुमेंट कल्सटर, गुगल मॅप सपोर्ट, स्विचेबल रिअर ABS, रायडिंग मोड्स, एलईडी लायटिंग, स्पोक्ड व्हिल असे फिचर्स देण्यात आले आहे. ही बाईक KTM 390 Adventure, BMW G 310 GS, Triumph Scrambler 400 X आणि Yezdi Adventure या बाईकला टक्कल देईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indurikar Maharaj Kirtan: 'स्वार्थासाठी धर्माचे भांडवल करू नका, गरिबांच्या पोरांचा बळी घेऊ नका', इंदुरीकर महाराजांनी नेत्यांना फटकारले

Maharashtra Politics : अजितदादांचं ठरलं! ७० हून अधिक जागांवर दावा, विद्यमान आमदारांनाही मोठा दिलासा!

Shukraditya Rajyog: सूर्य-शुक्राच्या युती बनला शुक्रादित्य राजयोग; 'या' राशींच्या सर्व इच्छा होणार पूर्ण

Maharashtra Politics : महायुतीसाठी २०९ जागांवर अनुकूल वातावरण, शिवसेनेच्या सर्व्हेक्षणातून दावा

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT