७ फेब्रुवारी पासून 'व्हॅलेंटाइन डे'च्या वीकला सुरुवात झालेली आहे. या दिवशी लोक एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करतात. त्याच वेळी, काही लोक असे आहेत जे या खास दिवशी आपल्या भावना व्यक्त करतात. जगभरात व्हॅलेंटाइनचा क्रेझ पाहायला मिळतो.
कपल्स अनेकदा व्हॅलेंटाईन डे साठी उत्साहित असतात. त्यांची इच्छा असते की त्यांच्या जोडीदाराला कोणत्या ना कोणत्या प्रकारे खास वाटावे. हा दिवस साजरा करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. पण प्रत्येक कपल्स एकमेकांना गिफ्ट्स देतात. जर तुम्हाला तुमच्या बॅायफ्रेंडला असं गिफ्ट्स द्यायचं असेल की ते पाहून तो खूप आनंदी होईल, तर आम्ही तुम्हाला काही सर्वोत्तम गिफ्ट्सच्या आयडिया सांगत आहोत. जाणून घ्या.
प्रेमपत्र किंवा चिठ्ठी
आजच्या डिजिटल युगात, हस्तलिखित म्हणजेच हाताने लिहिलेले पत्र किंवा चिठ्ठी ही सर्वात भावनिक आणि मौल्यवान भेट असू शकते. तुम्ही तुमच्या मनातील भावना एका सुंदर कागदावर लिहून तुमच्या जोडीदाराला देऊ शकता. ते आणखी खास बनवण्यासाठी तुम्ही रंगीत पेन, लहान स्केचेस किंवा अगदी फोटो देखील जोडू शकता. त्याच्यासोबत लाल गुलाब ठेवून त्याला रोमँटिक बनवा.
ग्रुमिंग किट
तुम्हाला तुमच्या जोडीदाराला उपयुक्त ठरेल अशी भेटवस्तू द्यायची असेल, तर तुम्ही त्याच्यासाठी ट्रिमिंग किट किंवा ग्रूमिंग किट खरेदी करू शकता. जर तुमच्या बॅायफ्रेंडला किंवा नवऱ्याला दाढी ठेवण्याची आवड असेल तर ही भेट त्याच्यासाठी उपयुक्त ठरेल. तुम्ही ते बाजारातून किंवा ऑनलाइन सहज खरेदी करू शकता.
एलईडी हार्ट शो पीस (पर्सन्लाइज्ड गिफ्ट)
जर तुम्हाला व्हॅलेंटाईन डे ला तुमच्या जोडीदाराला रोमँटिक गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदाराला एलईडी हार्ट शोपीस देऊ शकता. तुमच्या बजेटनुसार तुम्हाला ही वस्तू बाजारात किंवा ऑनलाइन मिळेल. ते आणखी रोमँटिक बनवण्यासाठी, तुम्ही तुमचे नाव आणि तुमच्या जोडीदाराचे नाव त्यावर लिहू शकता.
स्मार्टफोन (टेक गिफ्ट्स )
बॅायफ्रेंडला एखादी उपयुक्त वस्तू गिफ्ट म्हणून द्यायची असेल तर तुम्ही स्मार्टफोन देखील भेट देऊ शकता. यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार बाजारातून किंवा ऑनलाइन कोणताही चांगला स्मार्टफोन निवडू शकता. याशिवाय, तुम्ही तुमच्या जोडीदाराला स्मार्टवॉच, इअरफोन किंवा इअरबड्स भेट देऊ शकता. याचा ते रोजच्या जीवनात वापर करु शकतात.
घड्याळ
बहुतेक मुलांना घड्याळ घालण्याची आवड असते. जर तुमच्या बॅायफ्रेंडलाही घड्याळ घालण्याची आवड असेल तर तुम्ही त्याला या व्हॅलेंटाईन डेला एक चांगले घड्याळ भेट देऊ शकता. फक्त खात्री करा की त्याच्याकडे तुम्ही शोधत असलेले घड्याळ आधीच नाहीये. तुम्ही तुमच्या फॉर्मल किंवा कॅज्युअल लूकनुसार घड्याळ देखील निवडू शकता.
ट्रॅक सूट
कोणत्याही पुरूषासाठी ट्रॅक सूट ही सर्वोत्तम भेट आहे. तुम्ही कोणताही विचार न करता त्यांना हे भेट देऊ शकता. व्यायामापासून ते प्रवासापर्यंत याचा ते वापर करु शकतात. ट्रॅक सूट खूप आरामदायी आहे. जर तुमच्या बॉयफ्रेंडलाही आरामदायी पोशाख आवडत असतील तर ट्रॅक सूट हा त्याच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. फक्त हे खरेदी करताना, तुमच्या बॅायफ्रेंडचा आवडता रंग कोणता हे लक्षात ठेवा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.