Rose Day: रोझ डे साजरा करायचा आहे? बजेट कमी आहे? 'या' आहेत भन्नाट आयडिया

Rose Day Gifts Ideas: व्हॅलेंटाईन डे आठवडा सुरू झाल्यावर मुलांना खूप पैसे खर्च करण्याचा दबाव येतो. पण कमी बजेटमध्येही तुमच्यासाठी खास भेटवस्तूंच्या कल्पना आहेत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराला आनंदित करू शकता.
Rose Day
Rose DayCanva
Published On

व्हॅलेंटाईन डे आठवडा उद्यापासून सुरु होत आहे आणि महिलांना या विशेष दिवसाची तयारी उत्साहाने करत आहेत. हा आठवडा रोझ डेपासून सुरू होईल. परंतु, व्हॅलेंटाईन डेच्या हफ्त्यामध्ये पुरुषांच्या खिशावर खूप दबाव असतो, कारण त्यांना आपल्या प्रियेला काहीतरी खास देण्याची इच्छा असते. जर तुम्ही कमी बजेटमध्ये या दिवशी खास भेटवस्तू शोधत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी काही अनोख्या आणि बजेट-फ्रेंडली गिफ्ट आयडिया घेऊन आलो आहोत, ज्यामुळे तुमचं प्रेम व्यक्त करता येईल आणि तुमच्या जोडीदाराला आनंदी करता येईल.

Love letter
Love letterfreepic

स्वतः प्रेमपत्र लिहा

आजकाल अनेक लोक व्हिडिओ किंवा चित्रांचा वापर करून आपली भावना व्यक्त करतात, पण मुलींना जुने, पारंपारिक प्रस्ताव अजूनही आवडतात. तुमच्या जोडीदारासाठी एक भावनिक हस्तलिखित चिठ्ठी लिहून त्यांना एक खास भेट द्या. रंगीत स्केच पेन आणि त्यांच्या फोटोसह चिठ्ठी सजवा. त्यात गुलाबाचे फूलही जोडा. हे सर्व करण्यासाठी तुम्हाला फक्त २००-३०० रुपये खर्च येतील आणि तुमच्या जोडीदारासाठी ते एक खास अनुभव ठरेल.

Photo Frame
Photo Framefreepic

फोटो फ्रेम

तुमच्या जोडीदाराला रोमँटिक भेट देऊ शकता. तुमचा आणि तुमच्या जोडीदाराचा फोटो फ्रेम करून दिल्यास ती भेट खूप खास आणि संस्मरणीय होईल. या भेटीचे मूल्य स्वस्त वाटू शकते, परंतु त्यात दिलेले प्रयत्न तुमच्या जोडीदाराला नक्कीच प्रभावित करतील. यासाठी तुम्हाला फक्त १००-२०० रुपये खर्च करावे लागतील, जे एक साधे पण भावनिक गिफ्ट ठरेल.

bracelet
braceletgoogle

कपल ब्रेसलेट

रोझ डे साठी बाजारात अनेक वस्तू उपलब्ध असल्या तरी, कपल ब्रेसलेट्स एक आकर्षक आणि सुंदर भेट ठरू शकतात. जर तुमच्या जोडीदाराला ब्रेसलेट आवडत असतील, तर तुम्ही तिला एक खास ब्रेसलेट भेट देऊ शकता. तुम्ही कस्टमाइज्ड ब्रेसलेट किंवा कीचेनसुद्धा भेट देऊ शकता, ज्यावर तुमच्या दोघांचे नाव असू शकते. यासाठी तुम्हाला फक्त २०० ते ३०० रुपये खर्च करावे लागतील.

coffee mug
coffee mugfreepic

कॉफी मग

जर तुमच्या जोडीदाराला कॉफी पिण्याचा शौक असेल, तर त्यासाठी एक खास फोटो कॉफी मग भेट देणे एक उत्तम पर्याय ठरू शकतो. बाजारात तुम्हाला ३०० रुपयांमध्ये कस्टमाइज्ड कॉफी मग सहज मिळू शकेल, ज्यावर तुमच्या जोडीदाराच्या आवडीनुसार फोटो किंवा संदेश असू शकतो. ही भेटवस्तू तुमच्या जोडीदारासाठी खास ठरु शकेल.

flower buke
flower bukefreepic

सुंदर पुष्पगुच्छ

रोझ डे साठी तुमच्या जोडीदाराला गुलाबांचा एक सुंदर पुष्पगुच्छ देणे एक परफेक्ट आयडिया आहे. लाल गुलाबांनी भरलेला एक आकर्षक पुष्पगुच्छ तुमच्या पार्टनरला आनंद देईल आणि तुमच्या भावना व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग ठरेल. गुलाबांचा हा साधा पण प्रभावी गिफ्ट, तुमच्या जोडीदारासाठी एक संस्मरणीय आणि रोमँटिक अनुभव बनवेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com