World Kidney Day  saam tv
लाईफस्टाईल

Kidney Health: किडनीच्या आजारांचं प्रमाण वाढलंय; 'या' सोप्या टीप्स फॉलो करून टाळता येईल किडनी निकामी होण्याचा धोका

World Kidney Day : लक्षणं दिसताच घाबरून जाऊ नका कारण निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून मूत्रपिंडाचा आजार अनेकदा रोखता येतो. वेळीच निदान केल्याने आजाराची प्रगती कमी होते. तुमच्या मूत्रपिंडास निरोगी ठेवण्यासाठी आणि मूत्रपिंडाच्या आजारापासून बचाव करण्यासाठी याठिकाणी पाच टिप्स देण्यात आल्या आहेत त्याचे तुम्ही पालन करा.

Surabhi Jayashree Jagdish

सर्व वयोगटातील लोकांमध्ये किडनीच्या आजारांचं प्रमाण वाढतंय. चांगल्या आरोग्यासाठी तुमच्या किडनीचं आरोग्य चांगलं राखणं गरजेचं आहे. जीवनशैलीत योग्य बदल केल्यास किडनीच्या आजारास प्रतिबंध करता येतो आणि जीवनमान सुधारण्यास मदत होते. भारतातील लाखो लोक मूत्रपिंडाच्या आजाराने पिडीत आहेत.

नवी मुंबईतील खारघरच्या मेडिकवर हॉस्पिटल्समधील नेफ्रोलॉजिस्ट डॉ अमर कुलकर्णी म्हणाले की, किडनी ही रक्तामध्ये आढळणारे टाकाऊ पदार्थ, शरीरासाठी अनावश्यक असलेले अतिरिक्त खनिजे लघवीवाटे बाहेर काढून टाकते आणि शुद्ध रक्त संपूर्ण शरीरात वितरीत करते. जेव्हा मूत्रपिंडाचे कार्य कमी होते तेव्हा शरीरात हानिकारक विषारी पदार्थ तयार होतात, ज्यामुळे मूत्रपिंड निकामी होण्याच्या गंभीर गुंतागुंत वाढू लागतात. किडनीचा आजार हा मधुमेह, उच्च रक्तदाब, अनुवांशिकता, संसर्ग अशा विविध कारणांमुळे होऊ शकतो. यासाठी वेळीच निदान करणे गरजेचे आहे, कारण सुरुवातील बऱ्याचदा मूत्रपिंडाच्या आजाराची लक्षणे दिसून येत नाही. सामान्य लक्षणांमध्ये पाय किंवा चेहऱ्यावर सूज येणे, लघवीवाटे रक्त येणे, थकवा येणे, मळमळ आणि रक्तदाब कमी- जास्त होणे यांचा समावेश आहे.

भरपूर पाणी प्या व शरीर हायड्रेटेड राखा

तज्ज्ञांनी केलेल्या विविध अभ्यासांनुसार, योग्य हायड्रेशन मूत्रपिंडातील कचरा फिल्टर करण्यास आणि मूत्रपिंडातील खडे ओळखण्यास मदत करते. दिवसातून सुमारे १० ते १२ ग्लास पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत होते. मात्र गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे टाळले पाहिजे, विशेषतः किडनीसंबंधीच समस्या असलेल्या व्यक्तींनी ओव्हरहायड्रेशन टाळा.

निरोगी आणि संतुलित आहाराचे सेवन करा

तुम्हाला माहिती आहे का? ताजी फळे, भाज्या आणि तृणधान्ययुक्त समृद्ध आहार निवडल्यास मूत्रपिंडाचे कार्य सुरळीत होण्यास मदत होऊ शकते. आहारात अतिरिक्त मीठ, प्रक्रिया केलेले अन्न आणि शर्करायुक्त पेयाचे सेवन टाळा, कारण ते उच्च रक्तदाब आणि मधुमेहासाठी जोखीम घटक ठरतात जे किडनीच्या आजारास कारणीभूत घटक आहेत. बेरीज, पालेभाज्या आणि काजू यांसारखे किडनीस अनुकूल अन्न पदार्थांचा आहारात समावेश करा.

वजन नियंत्रित राखा आणि नियमित व्यायाम करा

शारीरिक हालचाली रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात, किडनीवरील ताण कमी करतात आणि रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. आठवड्यातून पाच वेळा किमान ४५ मिनिटे चालणे, पोहणे किंवा सायकलिंग करा.

नियमित आरोग्य तपासणीसाठी करा

किडनीच्या समस्या वेळीच ओळखणे आणि वेळीच व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, विशेषतः मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी हे फायदेशीर ठरते. तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी नियमितपणे संपर्कात रहा आणि मूत्रपिंडाचे चांगले राखा.डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनाशामक औषधे घेणे टाळा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT