Rice Water Benefits Saam tv
लाईफस्टाईल

Rice Water Benefits: केसांपासून ते त्वचेसाठी फायदेशीर आहे तांदळाचे पाणी, एकदा वापरुन तर पाहा

Rice Water Benefits For Skin And Hair : कच्चा तांदूळ ३० मिनिटे पाण्यात उकळवल्याने त्यातील जास्त स्टार्च पाण्यात सोडतो. ज्याचा आरोग्याला अधिक फायदा होतो कसे ते जाणून घेऊया.

कोमल दामुद्रे

Rice Water Benefits For Health :

भात हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ. लहानमुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना भात खायला आवडतो. भात शरीराला ऊर्जा प्रदान करतो. परंतु, भाताचेच नाही तर त्याच्या पाण्याचे देखील आरोग्याला फायदा होतो.

भाताचे (Rice) पाणी हे केस आणि त्वचेसाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. अनेकदा आपण भात शिजवताना त्यांचे पाणी फेकून देतो.पण या भाताच्या पाण्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात.

कच्चा तांदूळ ३० मिनिटे पाण्यात (Water) उकळवल्याने त्यातील जास्त स्टार्च पाण्यात सोडतो. ज्याचा आरोग्याला अधिक फायदा होतो कसे ते जाणून घेऊया.

1. त्वचेसाठी टोनर

तांदळाचे पाणी त्वचेसाठी टोनर म्हणून काम करते. चांगले टोनर, क्लिन्झर, त्वचा उजळवण्यासाठी, हायपरपिग्मेंटेशन, सन टॅन म्हणून काम करेल. तसेच त्वचेवरील डाग दूर होण्यास मदत करते. त्वचा (Skin) घट्ट करते आणि फ्रिकल्स देखील कमी करते.

तांदळाच्या पाण्यात कापसाचा गोळा बुडवून चेहऱ्याला लावा. तांदळाच्या पाण्यात अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, फिनोलिक आणि फ्लेव्होनॉइड संयुगे आढळतात जे त्वचेसाठी फायदेशीर आहेत.

2. केसासाठी कंडिशनर

तांदळाच्या पाण्याने केसांची स्थिती चांगली होते. तसेच केस मऊ आणि घट्ट होतात. केसांमधील गुंता सोडवण्यासाठी तांदळाचे पाणी चांगले असते. शाम्पू केल्यानंतर तांदळाच्या पाण्याने टाळूला मसाज करा. ज्यामुळे जीवनसत्त्व आणि खनिजे केसांच्या मुळापर्यंत पोहोचतात.

3. पचनासाठी उत्तम

तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या जाणवत असेल किंवा खाण्याची इच्छा होत नसेल तेव्हा तांदळाचे पाणी फायदेशीर ठरते. यामध्ये पौष्टिक आहार असतो. चवीनुसार मीठ घालून तांदळाचे पाणी प्यायल्याने पचनसंस्था सुरळीत होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Datiya Bypoll : निवडणुकीत पराभव होताच भाजपचा मोठा निर्णय; अख्खी कार्यकारिणी बरखास्त, पक्षात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

संध्याकाळी टाईमपास खायला बनवा क्रिस्पी मखाना चिवडा; रेसिपी आहे एकदम सोपी

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

SCROLL FOR NEXT