Beauty Products Hacks, Reuse Your Expire Makeup Products Saam Tv
लाईफस्टाईल

Beauty Products Hacks : एक्सपायर झालेल्या मेकअप किटला फेकू नका! या भन्नाट ट्रिक फॉलो करून करा Reuse

Reuse Your Expire Makeup Products : कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ती तिच्या मेकअप उत्पादनांचा पुरेपूर वापर करू शकत नाही. परिणामी उत्पादने साठवली जात असताना कालबाह्य होतात

कोमल दामुद्रे

Beauty Products Reuse :

सुंदर दिसण्यासाठी अनेक महिला महागड्या ब्युटी उत्पादनांचा वापर करतात. प्रत्येक मुलीच्या बॅगेमध्ये आपल्या छोटा का होईन मेकअप प्रोडक्ट पाहायला मिळते. सुंदर आणि स्टायलिश दिसण्यासाठी प्रत्येक मुलगी मेकअपची मदत घेते.

कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ती तिच्या मेकअप उत्पादनांचा पुरेपूर वापर करू शकत नाही. परिणामी उत्पादने साठवली जात असताना कालबाह्य होतात. हल्ली बाजारात अनेक कंपन्यांचे सौंदर्य उत्पादने उपलब्ध आहेत. परंतु, जर त्याचा आपण अधिक वापर करत नसलो तर ते खराब होते. जर तुमचा मेकअप किट किंवा इतर सौंदर्य उत्पादने वापरण्यापूर्वीच खराब झाले असतील तर त्यांना फेकून देऊ नका. याचा वापर आपण घरातील (Home) इतर गोष्टींसाठी आपण त्याचा वापर करु शकतो. जाणून घ्या त्याचा कसा वापर करायचा.

1. आयशॅडो

आपल्याकडे अनेक रंगाचे आयशॅडो असते. काही काळानंतर ते खराब होते. अशावेळी त्याचा वापर आपण नेलपेंटमध्ये टाकून नवीन शेड तयार करु शकतो.

2. लिप बाम

लिप बामचा वापर हा सर्वाधिक हिवाळ्यात होतो. परंतु, याचा अधिक वापर न केल्यास ते खराब झाल्यास ते फेकून देऊ नका. त्याचा वापर शूज चमकवण्यासाठी किंवा पँटची खराब झालेली झिप दुरुस्त करण्यासाठी करु शकता.

3. टोनर

आजकाल टोनर हा सगळेच वापरतात. यामुळे त्वचेचा PH संतुलित राहातो. परंतु याचा वापर नियमितपणे न केल्यामुळे तो खराब होतो. अशावेळे तुम्ही मोबाईल (Mobile), लॅपटॉप (Laptop), आरसा किंवा कारच्या काचा स्वच्छ करण्यासाठी वापरु शकतात.

4. परफ्यूम

आपल्याकडे परफ्यूमचे अनेक ब्रँड असतात. परंतु, परफ्यूम देखील खराब होतो हे अनेकांना माहित नाही. खराब झालेला परफ्यूम आपण रुम फेशनर किंवा बाथरुमध्ये वापरु शकतो.

5. मेकअप ब्रश

रोज मेकअप ब्रशने मेकअप केल्यास ब्रश लवकर खराब होतो. याच्या वापरामुळे त्वचेवर परिणाम होतो. परंतु, खराब झालेला मेकअप ब्रश आपण कीबोर्ड साफ करण्यासाठी वापरु शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sara Tendulkar: विम्बल्डन मधला सारा तेंडुलकरचा ग्लॅमरस स्टाईल लुक पाहिलात का?

Railway Tatkal Ticket Booking: तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आधारचा OTP आवश्यक, जाणून नवीन तिकीट बुकिंगची प्रक्रिया

टीम इंडियाला चौथ्या कसोटीआधी मोठा धक्का? पराभवानंतर कॅप्टन शुभमन गिलनं रिषभ पंतबाबत दिली मोठी अपडेट

Masala-Ae-Magic Masala: घरच्या घरी बनवू शकता बाजारात मिळणार सब्जी मसाला; आता प्रत्येक भाजी बनेल चटकदार

Politics: ठाकरेंनंतर नाशिकमध्ये शिंदेंनाही मोठा झटका; माजी खासदार भाजपच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT