टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या दशकभराच्या संशोधनानुसार कर्करोगाच्या उपचारांमुळे क्रोमॅटिनमध्ये अडथळे येतात. ज्यामुळे निरोगी पेशी कर्करोगात बदलू शकतात. उपचारानंतर रुग्णांमध्ये नवीन कर्करोगाचा प्रसार होऊ शकतो.
टाटा मेमोरियल सेंटरच्या अॅडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर येथील ट्रान्सलेशनल रिसर्च लॅबोरेटरीचे प्रोफेसर इंद्रनील मित्रा यांच्या मतानुसार रुग्णाला कर्करोगाचे (Cancer) निदान झाल्यानंतर केमोथेरपी, रेडिओथेरपी आणि शस्त्रक्रिया केली जाते.
एका अभ्यासानुसार कर्करोगाच्या मरणाऱ्या पेशी क्रोमोसोमचे तुकडे सोडतात. ज्यामध्ये निरोगी पेशींमध्ये कर्करोग निर्माण करण्याची क्षमता असते. या पेशी रक्तप्रवाहातून मार्गक्रमण करण्याची शक्यता असते. विविध अवयवांमधील निरोगी पेशींमध्ये प्रवेश करतात आणि शरीरातील इतर पेशींना खराब करुन कर्करोगाचा आजार (Disease) पुन्हा उद्भवण्यास कारणीभूत ठरतात.
डॉ. आर. ए. बडवे टीएमसी येथील प्रोफेसर एमेरिटस आणि इतर वरिष्ठ संशोधक यांनी म्हटले की, केलेल्या संशोधनानुसार शरीरातील चांगल्या पेशींमध्ये क्रोमोसोम प्रवेश करतो त्यामुळे कर्करोग पुन्हा उद्भवतो. याला 'मेटास्टेसिस' म्हणून ओळखले जाते. केमोथेरपी, रेडिओथेरपी किंवा शस्त्रक्रिया केल्यानंतर ही अधिक घातक ठरु शकते.
संशोधकांनी या शोधासाठी मानवी स्तनाच्या कर्करोगाच्या पेशींना ट्यूमर निर्माण करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या उंदरांवर प्रयोग करुन पाहिला. तसेच त्याच्यावर केमोथेरपी, रेडिओथेरपी किंवा शस्त्रक्रियेसह विविध उपचार करुन पाहिले. यानंतर उंदरांच्या मेंदूच्या नंतरच्या विश्लेषणातून मानवी डीएनए (cfChPs) आणि कर्करोगाच्या प्रथिनांमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली.
संशोधनातून असे सिद्ध झाले की, मानवी स्तनाच्या कर्करोगाच्या पेशी या मेंदूपर्यंत पोहोचतात. cfChPs निष्क्रिय किंवा नष्ट करण्यासाठी संयुगे वापरून उपचार केलेल्या उंदरांनी त्यांच्या मेंदूमध्ये कमीतकमी मानवी cfChPs किंवा कर्करोगाच्या पेशी आढळून आल्या आहेत. कर्करोगास कारणीभूत जीन्स असलेले, रक्तप्रवाहातून स्थलांतर करू शकतात आणि इतर अवयवांमध्ये निरोगी पेशींमध्ये प्रवेश करू शकतात, ज्यामुळे कर्करोगाचा मेटास्टॅटिक प्रसार होऊ शकतो.
सध्याच्या कर्करोगाच्या उपचार पद्धतींशी संबंधित माहिती मिळाली आहे. केमोथेरपी आणि रेडिओथेरपी, प्राथमिक ट्यूमर पेशींवर लक्ष्य करत असताना, मृत पेशींमधून cfChPs सोडतात. रक्तप्रवाहाद्वारे शरीरातील निरोगी पेशींमध्ये इतरत्र घुसू शकतात, ज्यामुळे नवीन ठिकाणी कर्करोग होण्याची शक्यता असते. तसेच डॉ नवीन खत्री म्हणाले की, यावर कर्करोगाच्या या आजारावर संशोधन सुरु आहे. टाटाचे बोन मॅरो ट्रान्सप्लांट तज्ज्ञ डॉ. नवीन खत्री यांनी सांगितले की, या उपचाराला तोंड देण्यासाठी कॉपर रेझवेराट्रोलचे सेवन केल्याने आराम मिळतो. या औषधामध्ये कर्करोगाच्या पेशींची तीव्रता कमी होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.