Republic day Childrens Speech yandex
लाईफस्टाईल

Republic Day 2025: प्रजासत्ताक दिनानिमित्त तुमची मुलं भाषण देणार असतील तर, 'या' टिप्स करा फॅालो, जिंकतील मनं

Republic Day Speech Tips for Childrens: प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात तुमची मुलं देखील सहभागी होत असेल. तर आम्ही तुमच्यासोबत अशा काही टिप्स शेअर करणार आहोत, ज्याचे पालन करून तुम्ही या खास दिवशी तुमच्या मुलाचा आत्मविश्वास वाढवू शकता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व शाळांमध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. यामध्ये मोठ्या संख्येने मुले सहभागी होतात. या दिवशी मुलं वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी होऊन देशाबद्दलचं प्रेम व्यक्त करतात. काहीजण नृत्यात सहभागी होतात तर काही संपूर्ण शाळेसमोर उभे राहून भाषण देतात.

प्रजासत्ताक (Republic Day 2025) दिन हा देशभक्तीच्या भावनेने भरलेला सण आहे. या दिवशी शाळांमध्ये विविध आणि विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. ज्यामध्ये मुलं उत्साहाने सहभागी होतात. जर तुमची मुलं या वर्षी शाळेच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होत असेल, तर त्यांनी सर्वोत्तम कामगिरी करावी अशी तुमची इच्छा असेलच. यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. जाणून घ्या.

प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगा

सर्वप्रथम, आपल्या मुलाला प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगा. त्यांना सांगा हा दिवस आपल्या देशासाठी का खास आहे. त्यांना आपल्या देशाच्या इतिहासाबद्दल काही खास गोष्टी सांगा. तुम्ही त्यांना राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत आणि भारताच्या राष्ट्रचिन्हाबद्दल माहिती द्या.

मुलांना कार्यक्रमाबद्दल सांगा

मुलांना सांगा की ते कोणत्या कार्यक्रमामध्ये भाग घेत आहेत. त्यांना काय करायचे आहे आणि त्याची तयारी कशी करायची आहे ते सांगा. जर तो भाषण देणार असेल तर त्याच्याकडून बोलण्याचा सराव करुन घ्या. जर तो नृत्य किंवा गाणे सादर करणार असेल तर त्याच्या किंवा तिच्याकडून सराव करुन घ्या.

मुलांचा आत्मविश्वास वाढवा

मुलांना सांगा की ते कार्यक्रमात खूप चांगली कामगिरी करु शकतात. त्यांना सांगा की तुम्हाला त्यांचा अभिमान आहे. जर तो किंवा ती घाबरत असेल तर त्यांना सांगा की भाषण देताना घाबरणे सामान्य आहे. त्यासाठी आत्मविश्वास गमावू नका.

मुलांना मदत करा

तुमच्या मुलांना प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी तयार होण्यास मदत करा. तिला किंवा त्याला योग्य कपडे घाला आणि त्यांची हेअर स्टाइल विशेष आणि नीट ठेवा. त्याला स्टेजवर कसे जायचे आणि कसे उभे राहायचे ते आधीच समजावून सांगा. त्यांच्याकडून आधीच भाषणाचा सराव करुन घ्या. जेणेकरुन त्यांच भाषण पाठ होईल.

शांत होण्यास सांगा

मुलांना सांगा की त्यांना स्टेजवर जाताना घाबरण्याची गरज नाही. त्यांना शांत राहून आपला परफॉर्मन्स सादर करायचा आहे. किंवा जर तो किंवा ती भाषण देणार असेल तर आत्मविश्वासाने आणि शांतपणे बोलायला सांगा.

शिक्षक कौतुक करतील

जेव्हा तुमचा मुलगा किंवा मुलगी या सर्व गोष्टींची व्यवस्थित काळजी घेईल तर साहजिकच तो किंवा ती शाळेच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सर्वोत्तम कामगिरी करेल. आणि शिक्षक त्यांचे खूप कौतुक करतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुम्हाला Ladki Bahin Yojana ची eKYC करून देतो, महिलेचा मोबाइल घेऊन इन्स्टाग्राम अकाउंट बनवलं, नंतर इतरांना अश्लील व्हिडीओ पाठवले

Honey Bee Attack: वेरूळ लेणी पहायला गेले असता भयंकर घडलं; 100 पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला

Titwala Crime: परप्रांतियांची मुजोरी! मराठी कुटुंबाला सळई- काठीने मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra News Live Update: नवले पुलावर चारचाकी वाहनाला आग, पूल परिसरात वाहतूक कोंडी

Nashik: नायब तहसीलदाराला अटक, म्हाडा भूखंड घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT