Remove Underarm Darkness Saam TV
लाईफस्टाईल

Remove Underarm Darkness : अंडरआर्म्समधील काळपटपणा मिनिटांत होईल गायब; फक्त 'या' पद्धतीने वापरा शँम्पू

How to Remove Underarm Darkness : अंडरआर्म्समधील काळपटपणा घालवण्यासाठी पुढील टिप्स फॉलो करणे महत्वाचं आहे. याने स्किन पूर्ण स्वच्छ होते आणि काळपटपणा देखील निघून जातो.

Ruchika Jadhav

आपल्या शरीरात वयानुसार अनेक बदल होत असतात. त्यात काही महिलांचे अंडरआर्म्स काळे पडण्याच्या समस्या वाढतात. महिलांमध्ये अंडरआर्म्स काळे पडल्याने त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. चार माणसांत जाताना आपल्या आवडीचे स्लिवलेस कपडे परिधान करता येत नाहीत. शिवाय सतत आपल्याला कोणीतरी काही बोलेल असे विचार मनात येत राहतात. आता तुम्हाला देखील असं वाटत असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी यावर एक रामबाण उपाय आणला आहे. हा उपाय केल्याने तुमचे अंडरआर्म्स सुंदर होतील आणि सर्व काळपटपणा निघून जाईल.

आज आम्ही तुम्हाला शँम्यूची कमाल सांगणार आहोत. एक रुपयांचा शँम्पू तुमच्या अंडरआर्म्सला कशा पद्धतीने स्वच्छ करतो याची माहिती सांगणार आहोत. या पद्धतीने तुम्ही अंडरआर्म्स साफ केल्यास त्यातील काळपटपणा दूर होईल आणि तुम्ही बिंधास्तपणे स्लिवलेस कपडे परिधान करू शकाल.

साहित्य

टोमॅटो पल्प - १ चमचा

कॉफी पावडर - १ चमचा

बेसन पीठ - १ चमचा

शँम्पू - १ चमचा

बेकिंग सोडा - १ चमचा

लिंबू - आर्धा

कृती

सर्वात आधी टोमॅटो पल्प बनवून घ्या. त्यासाठी टोमॅटो बारीक किसून घ्यावा लागले. त्यानंतर त्यामध्ये कॉफी पावडर, बेसन पीठ, शँम्पू, बेकींग सोडा आणि लिंबू व्यवस्थित मिक्स करा. हे मिश्रण मिक्स करताना यात पाणी टाकू नका. कारण पाणी न टाकता टोमॅटो पल्पमध्ये सर्व पावडर मिक्स होतात.

पेस्ट तयार झाली की आर्म्सवर ती अप्लाय करून घ्या. ही पेस्ट किमान १५ मिनिटे अशीच राहू द्या. त्यानंतर पेस्ट काढून अंडरआर्म्स स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. या पद्धतीने तुम्ही आठवड्यातून ३ वेळा अंडरआर्म्स स्वच्छ केले पाहिजेत. याने एका आठवड्यातच तुम्हाला योग्य तो रिजल्ट दिसेल.

टोमॅटो, कॉफी, बेसन पीठ यामध्ये जास्त प्रमाणात पोषक तत्व असतात. यातील व्हिटॅमीन्स आणि मिनरल्स आपल्या त्वचेवरील काळपटपणा दूर करतात आणि त्वचा स्वच्छ होते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :आंबेगावमधून दिलीप वळसेपाटील पिछाडीवर

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT