Benefits of Dark Chocolate : तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण डार्क चॉकलेट खाल्ल्याने 'या' आजारांवर होते मात

Dark Chocolate : डार्क चॉकलेट, व्हाईट चॉकलेट, ड्रायफ्रूट्स मिक्स असलेलं चॉकलेट्स उपलब्ध आहे. चॉकलेटची आवड लक्षात घेता दरवर्षी ७ जुलै रोजी वर्ल्ड चॉकलेट डे साजरा केला जातो.
Benefits of Dark Chocolate
Benefits of Dark ChocolateSaam TV

चॉकलेटची चव प्रत्येक व्यक्तीला आवडते. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनाच चॉकलेट खायला आवडतात. चॉकलेटमध्ये आता विविध प्रकार आले आहेत. डार्क चॉकलेट, व्हाईट चॉकलेट, ड्रायफ्रूट्स मिक्स असलेले चॉकलेट्स उपलब्ध आहेत. चॉकलेटची आवड लक्षात घेता दरवर्षी ७ जुलै रोजी वर्ल्ड चॉकलेट डे साजरा केला जातो.

Benefits of Dark Chocolate
SBI Chocolate Scheme: कर्जाचा हप्ता चुकला का? चिंता नको! SBI ने आणली जबरदस्त योजना

चॉकलेट खाल्ल्याने दातांना किड लागते, दात खराब होतात असं मोठी माणसं लहान मुलांना नेहमी सांगतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का? चॉकलेटचं सेवन केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. डार्क चॉकलेटमध्ये विविध प्रकारचे प्रोटीन आणि जीवनसत्व असतात. त्यामुळे आज डार्क चॉकलेट नेमकं कोणकोणत्या आजारांवर काम करतं, त्याची माहिती जाणून घेऊ.

हृदयाच्या विविध समस्यांवर फायदेशीर

डार्क चॉकलेटमध्ये अँटी-ऑक्सीडेंट असतं, त्यामुळे ज्या व्यक्तींना हृदयासंबंधीत आजार आहेत त्यांनी डार्क चॉकलेटचं सेवन केलं पाहिजे. डार्क चॉकलेट व्यक्तीच्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते. त्यामुळेहृयाच्या विविध समस्यांपासून आपला बचाव होतो.

ब्लड प्रेशर कंट्रोल

डार्क चॉकलेटमध्ये फ्लॅवेनॉइड्स असतं, त्याने आर्टरीज सुद्धा कमी होतात. एका रिसर्चनुसार, फ्लेवेनॉइड्स नाइट्रिक ऑक्साइड रिलीज करण्यास मदत करते. त्यामुळे आर्टरीज रिलॅक्स राहतात आणि ब्लडप्रेशर सुद्धा कंट्रोलमध्ये राहतं. ब्लडप्रेशर कंट्रोलमध्ये असलेल्या व्यक्तीला हार्टअटॅकचा धोका सुद्धा कमी असतो.

बुद्धीसाठी उपयुक्त

डार्क चॉकलेटमध्ये फ्लेवेनॉइड्स असल्याने त्याचा थेट परिणाम आपल्या बुद्धीवर सुद्धा होतो. याने आपल्या मेंदूला व्यवस्थित रक्त पुरवठा होतो. याने मेंदू कायम तल्लग राहतो. तसेच विस्मरण किंवा गोष्टी लक्षात न राहणे अशा समस्यांपासून आपला बचाव होतो. ज्या व्यक्तींना गोष्टी लक्षात राहत नाहीत त्यांनी डार्क चॉकलेट खाल्लेच पाहिजे.

त्वचा मुलायम राहते

अनेक व्यक्तींना उन्हाळ्यात त्वचेच्या विविध समस्या उद्भवतात. डार्क चॉकलेटमध्ये अँटी ऑक्सिडंट असतं. त्याने सूर्यकिरणांमुळे त्वचेवर उमटणारे डाग किंवा पुरळ कमी होतात. काही महिलांना सनस्क्रिन लोशन सुट होत नाही. त्यामुळे अशावेळी तुम्ही डार्क चॉकलेटचं केल्यास त्वचेसाठी उत्तम.

टीप : चॉकलेटबाबतच्या या माहितीचा साम टीव्ही दावा करत नाही.

Benefits of Dark Chocolate
Pista Chocolate Barfi: दिवाळीसाठी घरच्या घरी झटपट बनवा पिस्ता चॉकलेट बर्फी; पाहा रेसिपी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com