Chocolate Ice Cream Recipe: घरच्याघरी बनवा थंडगार चॉकलेट आयस्क्रीम; वाचा सिंपल रेसिपी

Chocolate Ice Cream Day (7 June 2024) : चॉकलेट आयस्क्रीम सर्वाधिक पसंतीची आयस्क्रीम आहे. तुम्हाला देखील ही आयस्क्रीम जास्त आवडत असेल तर त्याची रेसिपी आज जाणून घेऊ.
Chocolate Ice Cream Recipe: घरच्याघरी बनवा थंडगार चॉकलेट आयस्क्रीम; वाचा सिंपल रेसिपी
Chocolate Ice CreamSaam TV
Published On

आज नॅश्नल चॉकलेट आयस्क्रीम डे आहे. चॉकलेट आयस्क्रीम असं नाव जरी ऐकलं तरी ती आयस्क्रीम खाण्याची इच्छा होते. आता बातमी वाचताना तुम्हाला देखील चॉकलेट आयस्क्रीम खावीशी वाटत असणार. चॉकलेट आयस्क्रीम सर्वाधिक पसंतीची आयस्क्रीम आहे. तुम्हाला देखील ही आयस्क्रीम जास्त आवडत असेल तर त्याची रेसिपी आज जाणून घेऊ.

Chocolate Ice Cream Recipe: घरच्याघरी बनवा थंडगार चॉकलेट आयस्क्रीम; वाचा सिंपल रेसिपी
Papaya Ice Cream Recipe : आरोग्यासोबत जीभेचे देखील चोचले पुरवा; असे बनवा पपईचे आईस्क्रीम, पाहा रेसिपी

चॉकलेट आयस्क्रीम बनवण्यासाठी साहित्य

२ चमचे कोटो पावडर

१ १/२ कप दूध

४ चमचे साखर

१ कप आयस्क्रीम

इसेन्स आवडीनुसार

कृती

सर्वात आधी पातेल्यात एक कप दूध टाकून घ्या.

त्यानंतर थोडं दूध कोको पावडरमध्ये मिक्स करा आणि त्याची वेगळी पेस्ट बनवून घ्या.

त्यानंतर दूधामध्ये साखर मिक्स करा आणि गॅसवर तापण्यासाठी ठेवा.

साखर विरघळली की यामध्ये कोको पावडरची पेस्ट मिक्स करा.

त्यानंतर दूधात कोको पावडर पेस्ट छान मिक्स करून घ्या आणि दूध तापत राहूद्या.

दूध जास्तवेळ तापवा. किमान दूधाची कॉन्टीटी आर्धी होईपर्यंत तापवून घ्या.

त्यानंतर व्हाइट क्रीम आणि आयसक्रीम यामध्ये साखर टाकून मिक्सरला छान फिरवून घ्या.

आता मिक्सरमधील मिश्रण देखील कोको पावडरच्या दूधात मिक्स करून घ्या.

मिश्रण थंड झाल्यानंतर आयक्रीम कोनमध्ये सर्व भरून घ्या आणि थंड होण्यासाठी फ्रिजरमध्ये ठेवा.

तयार झाली तुमची झटपट चॉकलेट आयस्क्रीम. ही आयस्क्रीम लहान मुलांसह घरामध्ये प्रत्येकाला आवडेल. बाहेर मिळणाऱ्या आयस्क्रीमवर एक्सपायरी डेट लिहिलेली असते. मात्र तरी देखील त्यात काही केमीकल युक्त पदार्थ मिक्स केले जातात. बाहेरची आयस्क्रीम खाल्ल्यानंतर अनेक व्यक्तींना घसा दुखण्याच्या समस्या होतात.

घसा दुखणे, सर्दी आणि खोकला सारख्या समस्या देखील जाणवतात. त्यामुळे अशा गरमीमध्ये घरच्याघरी बनवलेली आयस्क्रीम खाणे आरोग्यासाठी चांगले आहे. याने तुम्हाला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

Chocolate Ice Cream Recipe: घरच्याघरी बनवा थंडगार चॉकलेट आयस्क्रीम; वाचा सिंपल रेसिपी
Thirsty After Eating Ice Cream : आईस्क्रीम खाल्ल्यानंतर तहान का लागते? पाणी पिणे योग्य की अयोग्य, जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com