Remove Tea Stains Saam Tv
लाईफस्टाईल

Remove Tea Stains: कपड्यांवर चहा-कॉफीचे डाग पडले? डाग घालवण्यासाठी वापरा 'ही' सोपी घरगुती ट्रिक

Remove Tea Stains: कपड्यांवरील चहा, कॉफी, शाई आणि लिपस्टिकचे हट्टी डाग काढायचे आहेत? ड्राय क्लीनरने सांगितलेले दूध, अल्कोहोल आणि बेकिंग सोड्याचे तीन सोपे घरगुती उपाय जाणून घ्या.

Shruti Vilas Kadam

Remove Tea Stains: कपड्यांवर डाग पडणे ही सामान्य गोष्ट आहे. कधी चहा किंवा कॉफी पिताना कपड्यांवर थेंब उडतात, तर कधी जेवताना तेल किंवा इतर पदार्थांचे डाग पडतात. पण, काही डाग कितीही वेळा कपडे धुतले तरी सहज निघत नाहीत. त्यामुळे आवडते कपडे खराब होण्याची भीती असते. अशावेळी महागड्या ड्राय क्लीनिंगचा पर्याय निवडण्याऐवजी काही सोपे घरगुती उपाय करून पाहता येतात कपड्यांवरील शाई, लिपस्टिक, चहा आणि कॉफीचे डाग काढण्याच्या सोप्या पद्धती जाणून घेऊया .

चहा-कॉफीचे डाग काढण्यासाठी बेकिंग सोडा

चहा किंवा कॉफी पिताना कपड्यांवर डाग पडणे सामान्य आहे. हे डाग काढण्यासाठी बेकिंग सोडा आणि पाण्याचा वापर करता येतो. यासाठी बेकिंग सोड्यामध्ये थोडे पाणी मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट डाग पडलेल्या जागेवर लावा आणि काही वेळ तशीच राहू द्या. त्यानंतर हलक्या हाताने तो भाग स्वच्छ करून कपडा धुवा. यामुळे चहा-कॉफीचे डाग कमी होण्यास मदत होऊ शकते.

कपड्यांवरील शाईचे डाग काढण्यासाठी वापरा कच्चे दूध

अनेकदा पेनची शाई कपड्यांवर लागते. विशेषतः लहान मुलांच्या गणवेशावर किंवा ऑफिसमध्ये वापरल्या जाणाऱ्या शर्टवर असे डाग पडतात. हे डाग काढण्यासाठी कच्च्या दुधाचा वापर करता येतो. ज्या भागावर शाईचा डाग पडला आहे, तो भाग काही वेळ कच्च्या दुधात भिजवून ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने कपडा चोळून स्वच्छ करा. दुधामधील फॅट्स आणि प्रथिने शाईचा डाग सैल करण्यास मदत करू शकतात. त्यामुळे हा उपाय करून पाहता येईल.

लिपस्टिकचे डाग काढण्यासाठी वापरा अल्कोहोल

आवडत्या टॉप, शर्ट किंवा ड्रेसवर लिपस्टिकचा डाग पडल्यास तो काढणे कठीण जाते. अशावेळी अल्कोहोलचा वापर करता येतो. एका स्वच्छ कापसाच्या बोळ्यावर किंवा कापडावर थोडे अल्कोहोल घ्या. त्यानंतर डाग असलेल्या भागावर हलक्या हाताने टिपा. डाग जोरात घासू नका. त्यामुळे तो आणखी पसरू शकतो. डाग कमी होईपर्यंत ही प्रक्रिया काळजीपूर्वक करा. मात्र, अल्कोहोल वापरण्यापूर्वी कपड्याच्या उलट्या भागावर टेस्ट करा. रेशमी, नाजूक किंवा ड्राय क्लीनिंग आवश्यक असलेले कपड्यांवर घरी प्रयोग करु नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रिया सुळेंना केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद, दुसऱ्या खासदाराला राज्यमंत्रीपद; शरद पवारांना केंद्रीय मंत्र्याचा प्रस्ताव, घडामोडींना वेग

Maharashtra News Live Update: मनोहर मामा भोसले प्रकरणात ED-CBI चौकशीची मागणी

PM Awas Yojana : पीएम आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी! दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे पैसे खात्यात जमा होणार

Kitchen Tips : फ्रिज नसतानाही भाज्या राहतील अनेक दिवस ताज्या; वापरा या सोप्या घरगुती ट्रिक्स

मंत्रालयात पुन्हा प्रशासकीय फेरबदल! दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या, प्रसाद शिंदेंची शालेय शिक्षण विभागात बदली

SCROLL FOR NEXT