Chanakya Niti On Success Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Success: चाणक्यांच्या या १० गोष्टी लक्षात ठेवा ! जीवनात कधीच येणार नाही अपयश...

How To Become Successful In Life: अनेकदा असे होते की, आपल्या यश पटकन मिळत नाही. त्यासाठी खूप वाट पाहावी लागते.

कोमल दामुद्रे

Success Tips By Chanakya Niti: आयुष्यात प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की, त्याला हव्या असणाऱ्या क्षेत्रात यश मिळायला हवे. त्यासाठी माणूस अथक प्रयत्न करत देखील असतो. परंतु, अनेकदा असे होते की, आपल्या यश पटकन मिळत नाही. त्यासाठी खूप वाट पाहावी लागते.

चाणक्यांनी सांगितले की, जीवनातील (Life) अडचणींवर मात करण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहे. ज्याचा अवलंब केल्याने माणूस कोणत्याही परिस्थितीत न डगमगता चांगले जीवन जगू शकतो. या १० गोष्टींचा अवलंब केल्यास जीवनात यशस्वी (Success) होऊ शकतो. जाणून घेऊया त्याबद्दल

1. चाणक्य सांगतात माणसांने कधीही सरळ असू नये. जंगलात जी झाडे सरळ आणि गुळगुळीत असतात त्यांना तोडताना कोणतीही अडचण येत नाही, म्हणून ती आधी कापली जातात. त्यासाठी माणसांने वागता काळजीपूर्वक वागावे.

2. चाणक्य म्हणतात की, संसार चालवण्यासाठी पैसा (Money) ही एकमेव शक्ती आहे. ज्याच्याकडे पैसा आहे त्यांच्याजवळ सगळे आहे. माणूस खरा श्रीमंत हा संपत्तीमुळे होतो. श्रीमंत असल्याने, ती व्यक्ती मूर्ख असली तरी ती बुद्धिमान, विद्वान आणि सक्षम मानली जाते.

3. क्रोध मृत्यूला आमंत्रण देतो आणि लोभ दुःखाला आमंत्रण देतात. दुसरीकडे विद्या ही दूध देणाऱ्या गाईसारखी आहे, जी माणसाचे सर्वत्र संरक्षण करते. याशिवाय आचार्य चाणक्य सांगतात की, समाधानी माणूस कुठेही सहज राहू शकतो.

4. चाणक्य म्हणतात की, बुद्धिमान व्यक्तीने आपला वेळ अभ्यास आणि ध्यानात घालवला पाहिजे. त्यासाठी यशाच्या शिखरावर कसे पोहोचता येईल याचा विचार करायला हवा.

5 अनुशासनहीन व्यक्ती नेहमी दुःखी राहते आणि इतरांनाही दुःखी करते. आचार्य चाणक्य म्हणतात की, जर असा माणूस समाजात राहतो तर तो नियम तोडतो आणि इतर लोकांसाठी आणि स्वतःसाठी अडचणी निर्माण करतो.

6. चाणक्य म्हणतात की, स्त्री पुरुषापेक्षा दुप्पट अन्न खाते परंतु, चौपट बुद्धिमान आणि हुशार असते. तर सहापट अधिक धैर्यवान असते.

7. तुम्ही तुमची गुपिते कोणाकडेही उघड करू नका. चाणक्य म्हणतात की ही सवय तुमचा यशाचा नाश करू शकते.

8. आचार्य चाणक्य म्हणतात की, प्रत्येक मैत्रीमागे काही ना काही स्वार्थ असतो. असा कोणताही मित्र नाही ज्यात स्वार्थ नाही.

9. आचार्य चाणक्य म्हणतात की शिक्षण हा सर्वात चांगला मित्र आहे. शिक्षित माणसाला सर्वत्र मान मिळतो.

10. चाणक्य पुढे सांगतात की, भूतकाळाबद्दल विचार करून पश्चात्ताप करू नये आणि भविष्याची चिंता करू नये. चाणक्य म्हणतो की ज्ञानी माणूस नेहमी वर्तमानात जगतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Water Issue : कल्याणमध्ये पाणी समस्येवरून मनसेचा संताप; केडीएमसीच्या अधिकाऱ्याच्या खुर्चीला घातला ‘चपलेचा हार’

WTC Points Table: पाकिस्तानच्या विजयानं भारताचं गणित बिघडलं; वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनच्या पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Maharashtra Politics: जळगावमध्ये शिंदे गटाची ताकद वाढली, बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्ते गळाला

Maharashtra Live News Update: सुट्टीवर गेलेल्या पावसाने पुण्याच्या ग्रामीण भागात लावली हजेरी

Sonali Kulkarni Photos: कसली भारी दिसतेय... सोनाली, साडीतील नवीन फोटो पाहिलात का?

SCROLL FOR NEXT