Relief From Piles in 5 Minutes saam tv
लाईफस्टाईल

Piles pain relief: आता 5 मिनिटांत पाईल्सच्या वेदनांपासून होईल मुक्तता; डॉक्टरांनी सांगितला एक उत्तम आणि सोपा उपाय

Relief From Piles in 5 Minutes: मूळव्याध (Piles/Hemorrhoids) किंवा 'पाईल्स' ही एक अशी आरोग्य समस्या आहे, जी रुग्णाला असह्य वेदना आणि प्रचंड अस्वस्थता देते. शौचास करताना होणारी वेदना आणि गुदद्वाराजवळ आलेली सूज यामुळे नीट बसणे किंवा चालणंही कठीण होतं.

Surabhi Jayashree Jagdish

  • मूळव्याध म्हणजे एनल रक्तवाहिन्यांची सूज

  • जास्त बसणे, ताण किंवा गर्भधारणा कारणीभूत

  • पाय उंच करून झोपल्याने आराम मिळतो

मूळव्याध ज्याला पाइल्स किंवा हेमोरॉइड्स (Hemorrhoids) म्हणूनही ओळखलं जातं. हा एनल कॅनालमधील सूजलेला रक्तवाहिन्यांचा प्रकार आहे. ही सूज सहसा जास्त वेळ बसण्यामुळे, ताणामुळे किंवा गर्भधारणेदरम्यान वाढलेल्या दाबामुळे होतं. काही वेळा मूळव्याध हा आपोआप कमी होतो. पण अनेक वेळा डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.

पाईल्समधील वेदना कमी करण्याचा सोपा उपाय

जर बवासीरमुळे वेदना वाढत असतील तर त्यासाठी एक साधा आणि त्वरित उपाय आहे. स्टॅनफोर्ड आणि यूसीएलएचे ट्रेंडिंग गैस्ट्रोएंटरोलॉजिस्ट डॉ. वेंडी यांनी एक सोपी आणि वेदनारहिक ट्रीक सांगितली आहे.

५ मिनिटांत बवासीरपासून आराम कसा मिळवावा?

डॉ. वेंडींच्या मते, बवासीरच्या सूज असताना पाय उंच करून ५ मिनिटांसाठी झोपणं हा एक जलद आणि प्रभावी उपाय ठरतो. त्यांनी एका व्हिडिओमध्ये दाखवलं आहे की, सोफ्यावर झोपून पाय हवेत उंच करून ठेवले आहेत आणि भिंतीचा आधारही घेतला आहे.

हे कसं काम करतं?

पाय उंच केल्याने एनल कॅनालमधील नसांवरील दबाव कमी होतो आणि रक्त वाहतूक गुरुत्वाकर्षणाच्या मदतीने हृदयाकडे परत येतं. यामुळे सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होते.

पाईल्सची वाढती संख्या

नेशनल इंस्टिट्यूट्स ऑफ हेल्थ (NIH) नुसार, बवासीर ही चौथ्या क्रमांकाची सर्वाधिक सामान्य गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या आहे. अमेरिकेत याचं ३.३ दशलक्ष नोंदणीकृत प्रकरणं आहेत. तर सेल्फ-रिपोर्टेड केसेस दरवर्षी १० दशलक्ष आहेत, जी सुमारे ४.४% लोकसंख्येशी समतुल्य आहे.

भारतामध्ये अंदाजे ५०% लोकांना आयुष्यात कधीतरी मूळव्याध होऊ शकतो, विशेषतः ५० वर्षे वयापर्यंत. त्यापैकी सुमारे ५% लोक सध्या या समस्येने ग्रस्त असतात.

मूळव्याध म्हणजे काय?

एनल कॅनालमधील सूजलेल्या रक्तवाहिन्या होत्या.

मूळव्याधची कारणे कोणती?

जास्त बसणे, ताण किंवा गर्भधारणा ही कारणे आहेत.

वेदना कमी करण्यासाठी काय करावे?

पाय उंच करून ५ मिनिटे झोपावे.

हा उपाय कसा काम करतो?

नसांवरील दबाव कमी होऊन सूज उतरते.

भारतात मूळव्याध किती प्रमाणात आहे?

अंदाजे ५०% लोकांना आयुष्यात होतो.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nose Blackheads Removal Tips: नाकावरचे ओपन पोअर्स कसे घालवायचे? घरगुती 4 सोपे उपाय करा

Women Health Care: महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची; स्त्रीरोग तज्ज्ञांनी सांगितलं 'हे' सल्ले

Mumbai Crime : समलैंगिक प्रेमाचा धक्कादायक शेवट! घरी जाण्यास नकार दिला, पार्टनरने छातीत चाकू खुपसला अन्...

Crime: कोचकडून हॉकी खेळाडूवर बलात्कार, स्टेडिअमच्या बाथरूमध्ये नेलं अन्...; पीडित मुलगी गरोदर

X युजर्स सावधान! हे नियम पाळा नाहीतर तुमचंही अकाउंट होईल Delete

SCROLL FOR NEXT