Relationship Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Relationship Tips: नात्यामध्ये दुरावा आलाय? 'या' टिप्स फॉलो करा, पार्टनरचा गैरसमज होईल दूर

Trust Build Tips: अनेकदा पती पत्नीमध्ये क्षुल्लक कारणांवरून भांडण होतात. परंतु अनेकदा हे वाद टोकाला पोहोचल्याचं आपण बघतो. आज आपण अशा काही टिप्स जाणून घेऊ या, ज्यामुळे पार्टनरचा गैरसमज दूर होईल.

Rohini Gudaghe

Husband Wife Relationship Tips

एका गोड नात्यासाठी 'एकमेकांवर विश्वास' असणं आवश्यक (Relationship Tips) आहे. जेव्हा एकमेकांवरील विश्वास कमी होतो तेव्हा नातेसंबंध कमकुवत होतात. बराच वेळा दोघांच्या नात्यात तिसरी व्यक्ती आल्यामुळं त्यांचं नातं बिनसताना दिसतं. अनेक वेळा एकाच घरामध्ये राहाताना जोडीदारासोबत छोट्या-छोट्या कारणांवरून भांडणं होतात. (latest accident news)

अनेकदा नकळत एकमेकांच्या भावना दुखावणाऱ्या घडतात, त्यामुळंही नात्यात दुरावा येतो. अशा वेळी जर तुमच्या नात्यामधील विश्वास कमी होत असेल, तर या गोष्टीची वेळीच काळजी घेणं गरजेचं आहे. गैरसमजामुळं नाराजी वाढत जातं. यामुळे अनेकदा आपण आपल्या जोडीदाराला कायमचं गमावून बसतो. यासाठी आज आपण काही टिप्स जाणून घेऊ या.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

माफी मागायला शिका

चूका सगळ्यांकडून होतात. प्रत्येक नात्यात कधीतरी भांडण (Husband Wife Relationship) होतात. यावेळी एकमेकांना दोष देण्याऐवजी माफी मागायला शिका. यामुळे पार्टनरला तुमच्याविषयी विश्वास निर्माण होतो. कोणतंही भांडण जास्त काळ लांबवू नका. वेळीच भांडण संपवा अन्यथा नात्यातील अंतर वाढत जातं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसमज निर्माण होतात.

वेळ घ्या

एखाद्यावर विश्वास निर्माण करणं अतिशय अवघड काम नाही. त्यामुळे पार्टनरला वेळ द्या. जेणेकरून त्याला तुमचा स्वभाव आणि तुमच्या सवयी समजतील. जोडीदाराचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न (Best Relationship Tips) करा. एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे व्यक्त होता येईल. वेळ दिल्यामुळं नातं मजबूत होतं.

भूतकाळ विसरा

अनेकदा आपण भूतकाळातील गोष्टींना जास्च महत्त्व देतो. भूतकाळामुळे आपलं वर्तमान खराब करतो. बरेचजण जुन्या गोष्टींवरून आपल्या जोडीदारासोबत भांडत बसतो. त्यामुळं वर्तमानातील नातं जास्त बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळं भूतकाळातील गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याची गरज आहे, जेणेकरून तुमचं वर्तमानातील नातं खराब होणार नाही.

मनमोकळेपणाने बोला

जर तुम्हाला असं जाणवतंय की, तुमच्या नात्यात गैरसमज वाढत (Trust Build Tips) आहे. अशा वेळी आपल्या पार्टनरसोबत मनमोकळं बोलणं गरजेचं आहे. एकमेकांशी बोलण्यामुळं अत्यंत कठीण समस्याही सहज सुटतात. तुमचं मत तुम्ही थेट व्यक्त करा. अनेकदा संवाद टाळल्यामुळे नातं अगदी टोकाला पोहोचल्याचं दिसतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

Tourist Spots: भारतातील सर्वाधिक भेट दिलेले 'ही' ५ पर्यटन स्थळ

Devendra Fadanvis : महाराष्ट्राने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर विश्वास दाखवलाय; अभूतपूर्व विजयानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

Priyanka Gandhi : वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा दणदणीत विजय; मोकेरी यांना 4 लाखांच्या फरकाने हरवलं

Uddhav Thackeray : लाटेपेक्षा त्सुनामी आली; महायुतीच्या विजयावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT