Relationship Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Relationship Tips : लग्न झाल्यानंतर संसार सुखाचा करायचा आहे? मग या गोष्टी लक्षात ठेवाच!

Tips For Happy Married life : . लग्न झाल्यानंतर आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. नात्यात प्रेम आणि विश्वास असेल तर नातं अगदी कोणत्याही वयात टिकू शकते.

कोमल दामुद्रे

Married Life :

लग्न झाल्यानंतर नवरा आणि बायको दोघांचे आयुष्य बदलते. लग्नानंतर आपल्या नात्यातही अनेक बदल होतात. लग्न झाल्यानंतर आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. नात्यात प्रेम आणि विश्वास असेल तर नातं अगदी कोणत्याही वयात टिकू शकते.

आजच्या धावपळीच्या जगात जोडीदाराला लग्नानंतर पुरेसा वेळ देता येत नाही. त्यामुळे नात्यात दूरावा येतो. एकतर ब्रेकअप होते किंवा घटस्पोट होतो. परंतु, असे अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्ही तुमचं नातं तुटण्यापासून वाचवू शकता. जर तुमचे देखील नुकतेच लग्न झाले असेल आणि वैवाहिक (Marriage) जीवनात गोडवा हवा असेल तर या गोष्टी लक्षात ठेवाच

1. संवाद

सुखी वैवाहिक जीवनासाठी जोडीदारांमध्ये (Partner) संवाद अधिक महत्त्वाचा असतो. यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराचे नीट ऐका, तुमच्या भावना मोकळेपणाने मांडा, एकमेकांचा आदर करा आणि एकत्र बसून समस्या सोडवा.

2. क्वालिटी टाइम

रोजच्या धावपळीच्या जगात जोडीदाराला पुरेसा वेळ देता येत नाही. अशावेळी तुम्ही एकदा तरी डेट नाईट किंवा वीकेंड आउटिंगचा प्लान करा. यामुळे तुम्हाला एकत्र वेळ घालवता येईल. तुमचे नाते देखील सुधारेल.

3. आदर

लग्न झाल्यानंतर जोडीदाराचा आदर करणे देखील तितकेच गरजेचे आहे. यासाठी तुम्ही एकमेकांचे व्यक्तिमत्त्व ओळखा, त्यांचे कौतुक करणे खूप महत्त्वाचे आहे. ज्यामुळे तुमच्या नात्यात (Relation) एकमेकांबद्दल आदर निर्माण होईल.

4. विश्वास

कोणत्याही नात्यात विश्वास हा अधिक महत्त्वाचा आहे. तो नात्याचा आधारस्तंभ म्हणून काम करतो. त्याचबरोबर जोडीदारासोबत प्रामाणिकपणा राखल्याने नात्यातील विश्वासही वाढतो.

5. स्तुती करणे

जोडीदाराची वेळोवेळी कामाच्या प्रती आणि त्याच्या गुणांची प्रशंसा करा. यामुळे नातेसंबंधावर सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे नात्यात प्रेम वाढते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

SCROLL FOR NEXT