Secrets For Happy Married Life After Wedding Saam Tv
लाईफस्टाईल

Relationship Tips: वैवाहिक जीवन होईल सुखी, फक्त जाणून घ्या हे 5 सिक्रेट

Secrets For Happy Married Life After Wedding: आज आम्ही तुम्हाला असे 5 सिक्रेट सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे वैवाहिक जीवन सुखी होईल.

Saam Tv

लग्न करणं जितकं सोपं आहे, तितकंच ते टिकवणं अवघड आहे. लग्नानंतर आयुष्यात अनेक बदल होतात. तुमच्या जबाबदाऱ्या, कुटुंब, गरजा, वेळ सर्वकाही बदलू लागतं. अनेक वेळा जोडीदाला जेव्हा या बदलत्या परिस्थितींशी जुळवून घेताना अडचणी येतात, तेव्हा नात्यात तडा जाऊ लागतो आणि कधी कधी नातं तुटतंही. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला असे 5 सिक्रेट सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे वैवाहिक जीवन सुखी होईल.

संवाद

कोणतेही नाते घट्ट करण्यासाठी संवाद खूप महत्त्वाचा असतो. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराशी बोलला नाही, तर त्यांना तुमच्या आवडी-निवडी कळू शकणार नाहीत, त्यामुळे संवाद महत्त्वाचा आहे.

एकमेकांसोबत वेळ घालवा

लग्नानंतर वाढलेल्या जबाबदाऱ्यांमुळे जोडप्यांना एकमेकांना वेळ देता येत नाही. त्यांचा बराचसा वेळ ऑफिसमध्ये जातो, त्यामुळे जोडपे एकमेकांसोबत वेळ घालवू शकत नाहीत. पती-पत्नीने दररोज किमान 1 तास एकत्र बसून वेळ सोबत घालवायला हवा.

जोडीदाराला स्पेस द्या

लग्नानंतर अनेकदा असे घडते की, जोडीदार एकमेकांना स्वतःसाठी स्पेस देत नाही. अशा परिस्थितीत कधी कधी जोडीदाराला आपण बंदिस्त अवस्थेत आहोत की काय, असं वाटू लागतं. त्यामुळे वैवाहिक नाते तुटते. अशा परिस्थितीत जोडीदाराला त्याच्या स्वतःसाठी थोडी स्पेस द्या.

संवादातून वाद मिटवा

कोणत्याही नात्यात भांडण होणे अगदी स्वाभाविक आहे, पण भांडण झाल्यावर ते सोडवणे खूप गरजेचे असते. भांडण वाढण्याच्या भीतीने अनेकदा जोडपे ज्या विषयावर भांडण झाले त्या विषयावर बोलत नाहीत, मात्र असे करणे दीर्घकाळासाठी हानिकारक ठरू शकते.

एकमेकांना आधार द्या

नाते कोणतेही असो, प्रत्येक नात्यात आधार महत्त्वाचा असतो आणि पती-पत्नीचे नाते विशेष असते. जोडप्यानी एकमेकांना समजून घेतले पाहिजे आणि त्यांच्या निर्णयांचे समर्थन केले पाहिजे. असे केल्याने तुमचे नाते घट्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Exit Poll : अजित पवार की शरद पवार, चिपळूणमध्ये कौल कुणाला? एक्झिट पोल कुणाच्या बाजूने? VIDEO

Pune Cantonment Exit Poll : पुणे कॅन्टोनमेंटमध्ये रमेश बागवे आमदार होणार? पाहा Exit Poll

World Travel : स्वित्झर्लंडपेक्षा लय भारी भारतातील 'हे' ठिकाण

Maharashtra Exit Poll: भुसावळमध्ये भाजपचे संजय सावकारे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Tongue colour Health: जिभेचा बदललेला रंग देतात 'या' गंभीर आजारांचे संकेत, तुमच्या जिभेचा रंग कोणता?

SCROLL FOR NEXT