Boyfriend Sickness : बॉयफ्रेंड सिकनेस काय आहे? मुलींनो, तुमच्यातही आहेत का ही लक्षणे

Boyfriend Sickness and Symptoms : बॉयफ्रेंड सिकनेस असल्यास कोणती लक्षणे जाणवतात याबाबत काहींना पुरेशी माहिती नाही. त्यामुळे आज या बातमीमधून याबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
Boyfriend Sickness and Symptoms
Boyfriend SicknessSaam TV
Published On

बॉयफ्रेंड सिकनेस हा शब्द सध्या ट्रेन्डमध्ये आहे. अनेक तरुणी याच्या शिकार होत असल्याचं म्हटलं जातंय. मात्र बॉयफ्रेंड सिकनेस नेमकं काय आहे? बॉयफ्रेंड सिकनेस असल्यास कोणती लक्षणे जाणवतात याबाबत काहींना पुरेशी माहिती नाही. त्यामुळे आज या बातमीमधून याबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

Boyfriend Sickness and Symptoms
Kangana Ranaut Boyfriend Rumors: कंगना रणौतसोबत दिसणारा तो 'मिस्ट्री मॅन' कोण?; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

लाईफ पार्टनरसाठी आपल्या मनात कायम प्रेम असेत. आपल्या प्रियकराला गमवण्याची भीती सुद्धा अनेकांच्या मनात असते. त्यामुळे मुली किंवा मुलं नात्यात पझेसीव्ह होतात. सतत पार्टनर भोवती फिरत राहतात, त्याला किंवा तिला एकटे सोडत नाहीत. मात्र असे वागत असताना काही मुलींच्या मनात बॉयफ्रेंड सिकनेस तयार होतो. बॉयफ्रेंड सिकनेसमुळे अनेक मुली स्वत: आपल्या अडचणी आणखी वाढवून घेतात.

लक्षणे

इतरांसाठी वेळ नसणे

बॉयफ्रेंड सिकनेसचे सर्वात मोठे लक्षण म्हणजे अशा मुलींना इतरांसाठी अजिबात वेळ नसतो. त्या मुली सतत आपल्या प्रियकराचाच विचार करतात. इतर व्यक्तींशी त्यांना बोलावे किंवा वेळ घालवावा असे अजिबात वाटत नाही. हे बॉयफ्रेंड सिकनेसचं पहिलं लक्षण आहे.

फक्त प्रियकराची काळजी घेणे

बॉयफ्रेंड सिकनेस असलेल्या मुली सतत आपल्या बॉयफ्रेंडचाच विचार करत असतात. त्यांना आपल्या कुटुंबातील व्यक्ती आजारी असले तरी सुद्धा त्यांची काळजी वाटत नाही. अशा वेळेत सुद्धा त्यांच्या मनात सतत प्रियकराची काळजी असते. हे लक्षण तुमच्यात सुद्धा असेल तर तुम्ही बॉयफ्रेंड सिकनेसमध्ये आहात.

मित्रांपासून दूर होणे

काही प्रियकर आपल्या प्रेयसीला मित्रांपासून दूर ठेवतात. बॉयफ्रेंड सिकनेस असलेल्या तरुणींना या गोष्टी चुकीच्या वाटत नाहीत. अशा तरुणी आपल्या प्रियकरासाठी सर्व मित्र आणि मैत्रिणींपासून दूर जातात. त्यांना बाहेर फिरायला जाणे सुद्धा आवडत नाही.

इतरांना शत्रू समजणे

बॉयफ्रेंड सिकनेस असलेल्या व्यक्ती आपल्या आजुबाजूला असलेल्या इतर व्यक्तींना शत्रू समजू लागतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टी असतात. बॉयफ्रेंड सिकनेस असलेल्या मुलींना त्यांच्या बॉयफ्रेंडने केलेल्या काही चुका सांगितल्यास अशा व्यक्ती त्यांना शत्रू वाटतात. बॉयफ्रेंड बद्दल कोणीही चुकीचं काही बोललं की अशा मुलींना समोरची व्यक्ती चुकीची वाटते.

Boyfriend Sickness and Symptoms
Prevent Travel Sickness: तुमच्याही मुलांना कार आणि बसमध्ये उलट्या होतात? तर करा 'हे' उपाय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com