Relationship Tips
Relationship Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Relationship Tips : प्रेम असूनही अनेकदा Love Marriage का तुटते ? असू शकते 'हे' कारण

कोमल दामुद्रे

Relationship Tips : कॉलेज वयात किंवा कामाच्या ठिकाणी अनेकदा तरुण-तरुणींचे प्रेमाचे सुत जुळते. अशावेळी प्रेमाच्या मर्यादा राखत ते अनेकदा विवाह बंधनात अडकतात. लग्न म्हटलं की, प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाची व सुंदर पायरी. आपण ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करतो त्या व्यक्तीसोबत कुणाला राहायला आवडणार नाही.

बरेचदा या प्रेमाच्या नात्यात (Relationship) खटके देखील उडतात तर काही वेळेस हेच नाते गोडव्याने देखील पुन्हा नव्यासारखे बहरु लागते. प्रत्येक नात्याची एक वेगळीच गोष्ट आहे. काही नाती ही आपल्या प्रेमाला नाव देतात तर काही नाती त्याला पूर्णविराम.

सध्या पुन्हा लव्ह मॅरेजचा ट्रेंड कमी झाला असून पुन्हा अरेंज्ड मॅरेजचा ट्रेंड सुरु झाला आहे. याची कारणे अधिक आहेत. काही नाती ही आजकाल प्रेमविवाहाला अधिक प्राधान्य देत नाही. काही जोडपी ही प्रेमविवाह करुन देखील अनेक अडचणींना सामोरे जातात. आजकाल प्रेमविवाह जास्त काळ चालत नाही. बऱ्याच अडचणींनंतर अखेर प्रेमविवाह मोडला. जाणून घेऊया असे का होते.

1. प्रेमात येते नैराश्य

सुरुवातीच्या काळात प्रेमाचा उत्साह हा अधिक असतो. त्यानंतर लग्नाचा विचार केला जातो. पण नंतर आयुष्यातील वास्तवाला सामोरे जाताना त्यांच्या अनेकदा खटले उडू लागतात. ज्यामुळे प्रेमात (Love) नैराश्य येऊन नाते तुटण्यायोग होते.

2. पालकांशी कमी सहवास

प्रेमविवाहात पालकांचा पाठिंबा कमी असतो. कारण मुलगा आणि मुलगी स्वत:च्या इच्छेने लग्न करतात, तर जबाबदारीही त्यांचीच असते. कधी ते पालकांच्या विरोधात जातात तर कधी त्यांची संमती असते पण थोडीच. अशा परिस्थितीत पालक त्यांना साथ देत नाहीत किंवा त्यांना पूर्णपणे साथ देऊ शकत नाहीत.

3. अपेक्षा ठेवणे

प्रेमविवाहात एकमेकांकडून जास्त अपेक्षा असतात. जोडीदारांना एकमेकांकडून जास्त अपेक्षा ठेवायला लागतात, अशा परिस्थितीत जर एखाद्या प्रसंगी कोणीही एकमेकांना साथ देऊ शकले नाही किंवा अपेक्षांवर उभे राहू शकले नाही, तर नाते डळमळीत होऊ लागते.

4. आदर न करणे

लग्नाआधी एकमेकांना ओळखत असल्यामुळे लग्नानंतर आदर कमी होतो. त्यासाठी एकमेकांच्या भावनांना किंवा मताला कमी प्राधान्य दिले जाते.

5. घाईघाईने निर्णय घेणे

कधी कधी प्रेमात पडल्यानंतर काही समज नसते आणि लोक पुढचा-मागचा विचार न करता लग्न करतात. घाईघाईने घेतलेले निर्णय योग्य असल्याचे सिद्ध होत नसल्याने नंतर पश्चाताप होतो. अशा परिस्थितीत लग्न फार काळ टिकत नाही.

6. व्यावहारिक अभाव

सुरुवातीला सगळं छान वाटतं, लग्नही थाटामाटात होतात पण नंतर आयुष्यातील सत्य आणि व्यावहारिक गोष्टी पाहता हा निर्णय चुकला असं वाटू लागते. त्यामुळे नाते तोडले जाते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Umbrella and Raincoat Shopping : पावसाळ्याच्या शॉपिंगसाठी मुंबईतील खास मार्केट; छत्री आणि रेनकोट फक्त २५० रुपयांत!

Kolhapur: बेकायदेशीर गर्भपात केल्याचा संशय, काेल्हापुरात डॉक्टर अटकेत; दाेघांकडून गर्भलिंग निदानाचे साहित्य जप्त

Solapur Crime: दारु पिऊन आईला शिवीगाळ केल्याचा राग, मित्रांनी केलेल्या जबर मारहाणीत तरुणाचा मृत्यू; सोलापूर हादरलं

Nashik Lok Sabha: आज प्रचाराचा शेवटचा दिवस; नाशिकमध्ये प्रचार सभांचा धुराळा, शांतिगिरी महाराजांचं जोरदार शक्ती प्रदर्शन

Today's Marathi News Live: महायुतीच्या सभेविषयी अफवा उडवणाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT