Relationship Tips Saam tv
लाईफस्टाईल

Relationship Tips : पार्टनर खरं प्रेम करतोय की, टाइमपास? या ५ गोष्टींवरुन कळेल

कोमल दामुद्रे

How To Know Your Partner Is Doing True Love:

अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींमुळे नात्यात दूरावा येतो. अशावेळी नात्यात प्रेम आणि विश्वास वाढवण्याची गरज अधिक असते. नात्यात बरेचदा सारं काही सुरळीत असताना त्याचे गणित बिघडते.

वयात आल्यानंतर आपण योग्य जोडीदाराच्या शोधात असतो. आपल्याला समजून घेणारा, सुख-दुखात साथ देणारा आणि आपल्यावर खरे प्रेम करणारा पार्टनर आपण शोधत असतो.

परंतु हल्ली सिच्युएशनशिप सारख्या ट्रेडमुळे अनेक जोडपी संभ्रमात आहे. आपल्याला खऱ्या प्रेमाच्या नादात अशी काही माणसे भेटतात जी फक्त त्याचा वेळ घालवण्यासाठी आपल्याशी जवळीक वाढवतात. जर तुम्हालाही जाणून घ्यायचे असेल तुमचा पार्टनर (Partner) खरं प्रेम करतो की, टाइमपास तर या ५ गोष्टींवरुन कळेल.

1. मोकळेपणाने बोला

नात्यात (Relation) एकमेकांशी मोकळेपणाने संवाद करणे अधिक गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या भावना जोडीदाराला अधिक चांगल्या प्रकारे कळतात. संवाद साधणे हे चांगल्या नातेसंबंधांचे वैशिष्ट्ये मानले जाते.

2. भविष्याबद्दल बोलणे

जी व्यक्ती आपल्या नातेसंबंधाला किंवा जोडीदाराला महत्त्व देतोय. भविष्याबद्दल बोलताना काहीच अडचणी येत नाही. परंतु, टाइपपास करणारी व्यक्ती भविष्याबद्दल बोलणे टाळतात.

3. भावनिक आधार

खऱ्या प्रेमाचे लक्षण म्हणजे जोडप्यांनी एकमेकांना भावनिक आधार देणे. कोणत्याही कठीण प्रसंगी एकत्र येऊन परिस्थितीचा सामना करणे. एकमेकांवर आरोप न करता भावनिकदृष्ट्या समजून घेणे.

4. निरोगी नाते

जर तुम्हाला जोडीदाराशी बोलून नात्यातील प्रत्येक गोष्ट जबरदस्ती करावी लागत असेल तर त्याचे तुमच्यावर खरे प्रेम नाही. नातेसंबंधात दोघांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे.

5. एकमेकांप्रती आदर

जोडप्यांचे एकमेकांवर प्रेम असेल तर ते कधीच विश्वासघात करत नाही. नेहमी एकमेकांचा आदर करा. जर तुमचा पार्टनर इतर मुलींसोबत फ्लर्ट करत असेल तर हे चांगले लक्षण नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: सांगली.. प्रभाकर पाटील कमळ ऐवजी घड्याळ घेऊन उतरणार मैदानात !

Viral Video : क्लास रूमध्ये पोरींचा जोरजोरात वाद, पोराला राग अनावर, डेस्कवरुन उठला अन्...

Ajinkya Rahane: योगायोग की आणखी काही...; टीम इंडिया फ्लॉप ठरताच अजिंक्य रहाणेने केली सूचक पोस्ट, म्हणाला...!

Jharkhand Assembly Election : जागावाटप ठरलं! काँग्रेस २९ तर झामुमो 43 जागांवर लढणार, RJD ला किती जागा मिळाल्या?

APY Scheme: दररोज ७ रुपये गुंतवा अन् ५ हजारांची पेन्शन मिळवा; अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक कशी करायची?

SCROLL FOR NEXT