Relationship Tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Relationship Tips : पार्टनरसोबत पहिल्यांदा फिरायला जाताय? चुकूनही या गोष्टी करु नका

Couple Tips : लग्न झाल्यानंतर जोडपी बाहेर फिरायला जातात. आपले नाते अधिक घट्ट व्हावे असे प्रत्येक जोडप्याला वाटत असते. अरेंज्ड मॅरेज असेल तर पती-पत्नीला एकत्र वेळ घालवण्याची संधी पहिल्यांदा मिळते.

कोमल दामुद्रे

Avoid 4 Mistake During Honeymoon :

लग्न झाल्यानंतर जोडपी बाहेर फिरायला जातात. आपले नाते अधिक घट्ट व्हावे असे प्रत्येक जोडप्याला वाटत असते. अरेंज्ड मॅरेज असेल तर पती-पत्नीला एकत्र वेळ घालवण्याची संधी पहिल्यांदा मिळते.

लग्न (Marriage) हे पवित्र बंधन म्हणून ओळखले जाते. प्रेमापासून सुरु झालेला हा प्रवास आयुष्यभर टिकवण्यासाठी आपण नात्यात अधिक प्रयत्न करतो. परंतु, अनेकदा जर आपण आपल्या पार्टनरसोबत (Partner) लग्ननानंतर पहिल्यांदाच फिरायला जात असाल तर या चुकूनही या गोष्टी करु नका. ज्यामुळे नात्यात (Relationship) दूरावा येऊ शकतो.

1. लग्नादरम्यान घडलेल्या गोष्टीवर चर्चा नको

लग्नाच्यावेळी अनेकदा आपल्याकडून काही चुका होतात. ज्यामुळे कुटुंबात मतभेद होतात. अशावेळी आपण पार्टनरसोबत बाहेर फिरायला गेल्यानंतर त्यावर चर्चा करु नका. तुमच्या भविष्याविषयी चर्चा करा.

2. अपेक्षा

जर तुमचे अरेंज्ड मॅरेज झाले असेल तर नात्यात एकमेकांना पुरेसा वेळ द्या. एकमेकांना समजून घ्या. जबरदस्तीच्या अपेक्षा करु नका. यापेक्षा तुम्ही भावनिकदृष्ट्या एकमेकांच्या जवळ कसे यायल याचा विचार करा.

3. भूतकाळाबद्दल चर्चा नको

अनेकदा जोडपी हनिमूनला गेल्यानंतर भूतकाळातील गोष्टींवर चर्चा करतात. ज्यामुळे नाते बिघडू शकते. अशावेळी तुम्ही तुमच्या नात्याविषयी चर्चा करा. भविष्यात तुमचे क्षण अधिक आनंदी कसे बनतील याचा विचार करा.

4. वाद नको

व्यक्ती भिन्न असतात, त्यांचा स्वभाव आणि विचार करण्याची पद्धत वेगळी असते. अशावेळी छोट्या छोट्या कारणांमुळे वाद होऊ शकतो. यावेळी भांडणे वाढवू नका. एकमेकांना सॉरी बोलून वाद संपवण्याचा प्रयत्न करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT