Green Gram Benefits Saam Tv
लाईफस्टाईल

Green Gram Benefits : हरभऱ्याचे करा नियमित सेवन, मधुमेहापासून ते कोलेस्ट्रॉलपर्यंत सर्व समस्या होतील दूर !

हरभऱ्याची भाजी हिवाळ्याच्या हंगामात आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते.

कोमल दामुद्रे

Green Gram Benefits : हरभरा ही भाजी हिवाळ्याच्या हंगामात येते हिवाळ्यामध्ये अनेक फळभाज्यांचे सीझन असते या काळात खूप सार्‍या हिरव्या भाज्या बाजारात येतात या भाज्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात त्यातील एक म्हणजे हरभऱ्याची भाजी.

या भाजीचे सेवन केल्याने अनेक प्रकारच्या गंभीर आजारापासून दूर राहण्यास मदत होते. हरभऱ्याच्या भाजीत पालक आणि कोबीपेक्षा अधिक पोषक घटक असतात त्यामुळे याचे सेवन केल्याने रक्तातील साखर, कोलेस्ट्रॉल सह इतर अनेक आजारांपासून बचाव करण्यास मदत होते. चला तर मग जाणून घेऊया हरभरा या भाजीचे आरोग्याला होणारे काही फायदे

1. मधुमेह (Diabetes) नियंत्रणात राहते

हरभऱ्याच्या भाजीमध्ये व्हिटॅमिन (Vitamins) सी,व्हिटॅमिन बी,फोलेट यांच्या भरपूर प्रमाण असते जे मधुमेहासाठी फायदेशीर असतात.त्यामुळे जर तुम्ही हरभऱ्याच्या समावेश तुमच्या आहारात केला तर रक्तातील साखरेचे (Sugar) प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होईल.

2. बद्धकोष्ठतेपासून आराम

हिरवा पालेभाज्यांमध्ये फायबरचे अधिक प्रमाण असते त्यामुळे जर तुम्हाला बद्धकोष्ठता असल्यास तुम्ही हरभरा पालेभाज्या खाल्ल्याने मल पातळ होण्यास मदत मिळते त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.

3. रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हिवाळ्यात हरभरा या भाजीचे सेवन करणे हा एक उत्तम पर्याय आहे. थंडीमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते त्यामुळे ही भाजी फायदेशीर ठरू शकते.या भाजीमध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी, अँटीऑक्साइड हे शरीराला आतून मजबूत करते.

4. दृष्टीसाठी फायदेशीर

डोळ्यांना मुक्त रॅडिकल पासून संरक्षण देण्यासाठी हरभरा या भाजीचा समावेश तुमच्या आहारात करणे गरजेचे आहे या भाजीमध्ये आढळणारे व्हिटॅमिन ए,अँटिऑक्साइड हे डोळ्यांसाठी फायदेशीर असते.

Chana

5. कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते

उच्च कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्याचे काम हरभऱ्याची भाजी करते या भाज्यांमध्ये आढळणारे फायबर, प्रथिने, कॅलरीज हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात, त्यामुळे रक्तातील चरबी कमी होते.जर तुम्हाला उच्च कोलेस्ट्रॉलच्या समस्या असतील तर हिवाळ्यात तुम्ही हरभऱ्याच्या भाजीचे सेवन केले पाहिजे.

6. वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

ज्याप्रमाणे हिरवे हरभरे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असते तसेच हिरव्या पालेभाज्यांमध्ये पाण्याचे (Water) प्रमाण जास्त असल्याने ते खूप वेळ भूक नियंत्रित ठेवतात त्यामुळे आपली भूक कमी होते आणि म्हणून आपले वजन कमी होण्यास मदत मिळते

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Recruitment: १२वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! रेल्वेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर, कारण अस्पष्ट

Maharashtra politics : ठाकरेंसह भाजपलाही धक्का, अनेक पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, भंडाऱ्याचे राजकारण फिरणार

पोलिसांकडून बलात्कार, पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव; सातारा महिला डॉक्टर प्रकरणातील ५ मोठे खुलासे

Raigad Tourism : तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल तर 'हे' ठिकाणे अजिबात मिस करू नका

SCROLL FOR NEXT