Women Health Saam Tv
लाईफस्टाईल

महिलांसाठी वरदान ठरतंय रिजनरेटिव्ह मेडिसिन; काय आहे ही नेमकी उपचार पद्धती?

रीजनरेटिव्ह मेडिसिन आणि त्यांच्या उपचारांमुळे आता महिलांना पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस), वंध्यत्व यांसारख्या परिस्थितींवर मात करण्याची संधी मिळत आहे.

Surabhi Jagdish

आधुनिक युगात रिजनरेटिव्ह मेडिसिन्स प्रचंड मागणी आहे. या औषधांमध्ये महिलांच्या आरोग्यासंबंधी समस्यांवर उपचार करण्याची प्रचंड क्षमता आहे. अशा नाविन्यपूर्ण पध्दतींमध्ये स्टेम सेल थेरपी, एक्सोसोम थेरपी आणि सेल्युलर रीजनरेशन यांचा समावेश होतो जे पारंपारिक औषध अयशस्वी झाल्यास गुंतागुंतीच्या स्त्रीरोगविषयक समस्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रभावी ठरतात. अशा रीजनरेटिव्ह मेडिसिन आणि त्यांच्या उपचारांमुळे आता महिलांना पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस), वंध्यत्व यांसारख्या परिस्थितींवर मात करण्याची संधी मिळत आहे.

स्त्रियांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो ज्यामुळे त्यांच्या जीवनाची गुणवत्ता ही मासिक पाळीत येणाऱ्या अडचणींपासून आणि गर्भधारणा साध्य करण्यापासून ते हार्मोनल असंतुलन किंवा त्रासापर्यंत कमी होऊ शकते. उदाहरणार्थ, वंध्यत्व आणि पीसीओएस हे बरे होणे अशक्य समजले जाते आणि बहुतांश पारंपारिक उपचार मूलभूत समस्यांचे निराकरण करण्याऐवजी नियंत्रणावर भर देतात.

रीजनरेटिव्ह मेडिसिन संशोधक आणि स्टेमआरक्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे संस्थापक डॉ. प्रदीप महाजन म्हणाले, रुग्णाच्या ‘स्वतःच्या’ शरीरातील ऊती वापरुन एखाद्या आजारावर उपचार करणं हे मुख्य ध्येय समोर ठेवून सेल बेस थेरेपी कार्य करतं. पीसीओेस किंवा वंध्यत्वासारख्या समस्यांवरही याप्रकारे उपचार करता येतात. स्टेम सेल आणि एक्सोसोम थेरपी ही सूज कमी करणं, ऊतींचे पुनरुत्पादन वाढवणे आणि ओव्हरीचे कार्ये सुधारणे यावर लक्ष केंद्रित करते.

स्टेम सेल थेरपी- ऊतींची दुरुस्ती आणि सूज नियंत्रणात आणतं

या पेशी पुनरुत्पादन आणि ऊतींच्या दुरूस्तीमध्ये मदत करतात जिथे ऊतकांची सर्वात जास्त गरज असते. अधिक महत्त्वाचे म्हणजे, स्त्रीरोगविषयक आरोग्याच्या बाबतीत, एंडोमेट्रिओसिस आणि पीसीओएस सारख्या परिस्थितीशी संबंधित तीव्र दाह कमी करण्यासाठी तसंच पुनरुत्पादक अवयवांचे कार्य सुधारण्यासाठी स्टेम सेल थेरपीचे फायदेशीर ठरते.

स्टेम सेल्स या खराब झालेल्या ऊतींना त्यांना दुरूस्तीला चालना देण्यासाठी त्या भागात इंजेक्ट केल्या जाऊ शकतात. अशा रूग्णांमध्ये हे महत्वाचे आहे जे या नियमित उपचार पद्धतींना प्रतिसाद देत नाहीत.

पीसीओएसच्या बाबतीत, स्टेम पेशी दाहक लक्षणांना कमी करण्याचे कार्य करतात आणि म्हणून त्यांची लक्षणे जसे की अनियमित मासिक पाळी आणि चयापचय विकार कमी होतात. हे अंडाशयांमध्ये अधिक फॉलिक्युलर विकासास देखील मदत करू शकतात ज्यामुळे गर्भधारणेची क्रिया विशेषतः वंध्यत्वाची समस्या असलेल्या रुग्णांमध्ये अधिक चांगली होऊ शकते.

एक्सोसोम थेरपी

स्टेम पेशींपासून तयार होणारे एक्सोसोम प्रथिने, लिपिड्स आणि अनुवांशिक पदार्थांनी समृद्ध असतात जे खराब झालेल्या ऊतींच्या भागांना लक्ष्य करू शकतात आणि उपचार प्रक्रिया सक्रिय करू शकतात. एक्सोसोम्स हे अनुवांशिक स्थिती आणि प्रथिने तुमच्या संपूर्ण शरीरात पेशींपर्यंत पोहोचवतात आणि ते पेशींमधील संवादाचे मार्ग तयार करतात.

जरी स्टेम पेशींमध्ये ऊतींचे पुर्ननिर्मिती करण्याची क्षमता असते, तरीही एक्सोसोम्स शेजारच्या पेशींना बायोएक्टिव्ह सिग्नल देतात ज्यामुळे इम्यूनोरेग्युलेटरी आणि बरे होण्याचे प्रतिसाद मिळतात.

रिजनरेटिव्ह मेडिसिन केवळ वेदना कमी करण्यावर लक्ष केंद्रित करत नाही तर सामान्य शारीरिक प्रक्रिया पुनरुज्जीवित करण्यावर देखील केंद्रित करते. वंध्यत्व उपचारांच्या बाबतीत, तसेच स्त्रियांमधील पीसीओएसच्या च्या बाबतीत, स्टेम सेल्स आणि एक्सोसोम थेरपीचा वापर करून, हार्मोनल समस्या किंवा ओव्हेरीन कार्यक्षमता वाढविण्यात मदत करते. बऱ्याच स्त्रियांना या उपचाराने शस्त्रक्रिया टाळता येऊ शकते.स्त्रियांमध्ये स्त्रीबीजाची गुणवत्ता सुधारण्यासाठी देखील यामाध्यमातून यश मिळाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2025 Mega Auction Live: 'इंडियन' प्रीमियर लीग! 7 भारतीय खेळाडूंवर लागली 126 कोटींची बोली

Konkan Travel : कोकणचे वैभव असलेल्या 'या' राजवाड्याला कधी भेट दिलीय का?

Maharashtra News Live Updates: शनिवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट ‌

Sanjay Derkar News : 10 वर्षात मतदारसंघात काम झालं नाही; ठाकरेंचे नवनिर्वाचित आमदार देरकर यांची प्रतिक्रिया

Sharad Pawar : 'आम्ही सत्तेत नसलो तर...'; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर शरद पवारांची पहिली मोठी प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT