Manasvi Choudhary
मार्गशीर्ष पौर्णिमेला श्रीदत्त जंयती साजरी केली जाते. या दिवशी दत्तात्रेय महाराजांचा जन्म झाला होतो. मार्गशीर्ष पौर्णिमेला मृगशीर्ष नक्षत्रात सायंकाळी दत्तात्रेय महाराजांचा जन्म झाला.
म्हणून तेव्हापासून मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला श्री दत्तजंयत्ती साजरी केली जाते. दत्तजंयत्तीच्या पूजेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा.
यानंतर दत्तात्रेय महारांजाची मूर्तीची पूजा करावी. पूजेला मूर्तीचा अभिषेक घाला. गंगाजल अर्पण करावे.
दत्तात्रेयांची पूजा विधीनुसार फुले,चंदन, धूप, फळे, मिठाई, नैवेद्य अर्पण करावेत.
दत्तात्रेय जंयतीच्या दिवशी भगवान दत्तात्रेय मंत्राचा जप करावा. दत्तात्रेय नावाचा जप केल्याने भगवान दत्तात्रेय प्रसन्न होऊन भक्तांवर आशीर्वाद देतात.
दत्तजंयत्तीच्या दिवशी 'दत्तमाला मंत्र' किंवा 'दत्तस्तोत्र' 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' याचे पठण करावे.
फळे, खीर किंवा गोड पदार्थ यांचा नैवेद्य अर्पण करावा. नैवेद्य दाखवल्यानंतर श्री दत्तात्रेयांची आरती करावी.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.