Manasvi Choudhary
सोंडाई हा किल्ला अनेकांना माहित नाही. कर्जतच्या निसर्गसौंदर्यामध्ये सोंडाई किल्ला आहे.
कर्जतमधील सोंडाई या गावात टेकडीवर हि किल्ला आहे. सोंडाई गावाच्या नावावरून किल्ल्याचं नाव पडलं असावं.
सोंडाई किल्ल्यावर सोंडाई देवीची मूर्ती आहे. सोंडाई देवीची मूर्ती उभी असलेल्या वरच्या खडकात पायऱ्या देखील कोरल्या आहेत.
कर्जतपासून ६ किमी अंतरावर सोंडाई किल्ला आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी सोंडेवाडी आणि वावर्ले ही गावे आहेत.
सोडाई किल्ल्याला भेट दिल्यानंतर तुम्हाला माथेरान, मोरबे धरण, वावर्ले धरण, प्रबळगड, इर्शाळगड हि सुंदर दृश्ये दिसतात.
सोंडाई किल्ला अत्यंत सोपा मार्ग असल्याने येथे पर्यटक ट्रेकिंगसाठी भेट देतात. कोणत्याही ऋतूत येथे पर्यटक भेट देतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.