Reasons For Lack of Sleep Saam Tv
लाईफस्टाईल

Lack of Sleep: सर्व प्रयत्न करूनही झोप पूर्ण होत नाही? या चुकांमुळे होऊ शकतो परिणाम

Reasons For Lack of Sleep: जेव्हा पुरेशी झोप होत नाही, तेव्हा सकाळी आपली चिडचिड होते. ज्याचा आपल्या संपूर्ण दैनंदिन दिनचर्येवर परिणाम होतो. अशा वेळी चांगली झोप लागणे खूप गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या चुका आहेत, ज्यांमुळे आपली झोप पूर्ण होत नाही.

Saam Tv

दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी आपण रात्री झोपायला जातो तेव्हा अनेक वेळा आपल्याला झोप येत नाही. पण तुम्हाला माहित आहे का की, यामागचे कारण आपल्याच काही चुका आहेत.

जेव्हा पुरेशी झोप होत नाही, तेव्हा सकाळी आपली चिडचिड होते. ज्याचा आपल्या संपूर्ण दैनंदिन दिनचर्येवर परिणाम होतो. अशा वेळी चांगली झोप लागणे खूप गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या चुका आहेत, ज्यांमुळे आपली झोप पूर्ण होत नाही.

जड आणि तळलेले पदार्थ खाणे

रात्री झोपण्यापूर्वी जड आणि तळलेले अन्न खाऊ नका. यामुळे तुम्हाला पचनामध्ये समस्या येऊ शकतात. यामुळे ॲसिडीटी आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या उद्भवू शकतात आणि तुम्हाला झोपेचा त्रास होऊ शकतो.

फोन किंवा टीव्ही पाहणे

अनेक लोक झोपण्यापूर्वी फोन वापरतात, पण असे करणे अत्यंत चुकीचे आहे. फोन आणि टीव्हीमधून निघणारा निळा प्रकाश तुमच्या मेंदूवर परिणाम करतो आणि तुमच्या झोपेच्या चक्रावरही परिणाम करतो.

दिवसा झोपणे

दिवसा झोपल्याने रात्रीच्या झोपेवरही परिणाम होतो. जर तुम्ही दिवसा झोपत असाल तर तुम्हाला रात्री झोपायला त्रास होऊ शकतो. अशातच दिवसभरात अर्ध्या तासापेक्षा जास्त झोपू नका. हे लक्षात ठेवा.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parth Pawar: पार्थ पवारांवर १८०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Solapur News : सोलापूरमध्ये धक्कादायक घटना! विमानाच्या पंखात अडकला पतंगाचा मांजा, थोडक्यात दुर्घटना टळली

Maharashtra Live News Update: - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज पुणे दौरा, शाखा अध्यक्षांची घेणार बैठक

Famous Influencer Death : प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचं निधन; ३२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, नेमकं कारण काय?

Vande Bharat Express : देशात १८६ वंदे भारत एक्सप्रेस धावतात, महाराष्ट्रात संख्या किती? वाचा

SCROLL FOR NEXT