Raw Papaya Benefits
Raw Papaya Benefits Saam Tv
लाईफस्टाईल

Raw Papaya Benefits : महिलांच्या 'त्या' काळातील वेदना कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते कच्ची पपई !

कोमल दामुद्रे

Raw Papaya Benefits : आरोग्याच्या दृष्टीने आपण वेगवेगळी फळे खात असतो. पण काही फळांमध्ये जीवनसत्त्व (Vitamins) अ, ब, क, ड आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखे खनिजे आढळतात.

पपई (Papaya) हे एक असे फळ आहे जे आपण सलादमध्ये खातो, ज्यूसच्या रूपात पितो. इतर फळांप्रमाणेच पपई आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. या फळामध्ये खनिजे, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. यात कॅलरीजचे प्रमाण कमी असल्याने आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. पपईमुळे पाचनशक्ती वाढण्यास मदत होते.

कच्ची पपई खाल्ल्याने महिलांना मासिक पाळी येण्याच्या त्रासात आराम मिळतो. यामुळे शरीरात ऑक्सिटोसिन आणि प्रोस्टाग्लॅंडिनची पातळी वाढते ज्यामुळे वेदना कमी होतात. कच्ची पपई खाल्ल्याने किंवा त्याचा रस प्यायल्याने शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण योग्य राहते. कच्ची पपई खाल्ल्याने शरीराला भरपूर फायबर मिळतं.

कच्च्या पपईचे फायदे -

१. मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी -

कच्च्या पपईचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. कच्च्या पपईचे सेवन केल्याने शरीरातील ऑक्सीटोसिन आणि प्रोस्टाग्लॅंडिनची पातळी वाढते, ज्यामुळे वेदना कमी होते. मासिक पाळीत होणाऱ्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी कच्च्या पपईचे सेवन फायदेशीर ठरते.

२. आईच्या दुधासाठी -

कच्च्या पपईचे सेवन केल्याने दुध उत्पादनाची क्षमता वाढते, त्यामुळे लहान मुलांची आहारातील क्षमता पूर्ण होते. त्यामुळे स्तनदा मातेने कच्च्या पपईचे सेवन करावे.

३. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी -

कच्च्या पपईत जीवनसत्त्व क आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. यासोबतच कच्ची पपई सर्दी-खोकला रोखण्यासही मदत करते.

४. युरिन इन्फेक्शन दूर करण्यासाठी -

बहुतेक महिलांना युरिन इन्फेक्शनची समस्या असते. अशा परिस्थितीत युरिन इन्फेक्शनच्या समस्येवर मात करण्यासाठी कच्च्या पपईचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. कच्ची पपई शरीरात संसर्ग निर्माण करणाऱ्या जीवाणूंची वाढ रोखण्यास मदत करते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

Esha Gupta च्या बोल्ड फोटोंची एकचं चर्चा, फोटो पाहून चाहते थक्क

Custard Apple Benefits : डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सीताफळ उपयुक्त; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT