Rakshabandhan Wishesh In Marathi  Saam tv
लाईफस्टाईल

लाडक्या बहीण-भावाला द्या मराठीतून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा, Raksha Bandhan Wishes In Marathi

Raksha bandhan Messages: यावर्षी येत्या ३० ऑगस्टला म्हणजे बुधवारी सगळीकडे रक्षाबंधन सण (Raksha Bandhan 2022) साजरा केला जाणार आहे.

Priya More

Raksha Bandhan Messages in Marathi 2023:

बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक आणि अतुट नात्याला समर्पित असणारा सण म्हणजे रक्षाबंधन (Raksha Bandhan). यावर्षी येत्या ३० ऑगस्टला म्हणजे बुधवारी सगळीकडे रक्षाबंधन सण (Raksha Bandhan 2022) साजरा केला जाणार आहे. या सणाची प्रत्येक बहीण आणि भाऊ आतुरतेने वाट पाहत असतो.

रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून भावाला दिर्घ आयुष्य आणि सुख मिळावे यासाठी प्रार्थना करते. त्याचप्रमाणे भाऊ देखील आपल्या बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेत असतो. त्याचप्रमाणे या सणानिमित्त प्रत्येक भाऊ आणि बहीण एकमेकांना शुभेच्छा देत हा सण साजरा करतात. या रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्ही देखील आपल्या बहीण किंवा भावाला रक्षाबंधन सणानिमित्ताने मराठीमध्ये शुभेच्छा (Raksha Bandhan Wishes In Marathi) देत हा सण साजरा करु शकता.

१. हे बंध स्नेहाचे,

हे बंध रक्षणाचे,

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

२. राखी एक प्रेमाचं प्रतीक आहे

राखी एक विश्वास आहे

तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेन

हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या पवित्र दिनी मी तुला देऊ इच्छितो !

लाडक्या ताईला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

३. रक्षाबंधनाचा सण हा आला

ताई दादाच्या आठवणी जाग्या झाल्या,

एका राखित सर्व काही सामावले

बहीण भावाचे प्रेम जगावेगळे.

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

४. रक्षाबंधनाचा हा शुभ दिवस

भावा-बहिनीच्या अखंड प्रेमाचा करतो नवस

आम्हा भाऊ बहिणीतील प्रेम कायम असेच राहो हीच इच्छा

सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

५. यावेळी तुझे काहीच ऐकणार नाही,

कितीही उशीर झाला तरी

तुला भेटल्याशिवाय राहणार नाही.

लग्न झाले म्हणून काय झाले.

तुझ्या रक्षणाचे काम

माझ्याकडून कधीच जाणार नाही.

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

६. काही नाती खूप अनमोल असतात,

हातातील राखी मला याची कायम आठवण करून देत राहील…

तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,

आणि आलच तर त्याला आधी मला सामोरे जावे लागेल…

लाडक्या ताईला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

७. सोबत वाढले सोबत खेळले

प्रेमात न्हाले बालमन

याच प्रेमाची आठवण म्हणून

आला हा रक्षाबंधनाचा सण

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

८. ताई तू सासरी गेली

पण मी तुला विसरलो नाही

तुझ्या आठवणीत रडतो

रक्षाबंधनाची वाट पाहतो

लाडक्या ताईला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

९. रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन,

घेऊन आला हा श्रावण,

लाख लाख शुभेच्छा तुला

आज आहे बहीण-भावाचा पवित्र सण

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

१०. आपल्या लाडक्या बहिणीने आपल्या हातावर बांधलेल्या

राखीला जागून भाऊ तिच्या रक्षणाची जबाबदारी स्विकारतो.

रक्षाबंधनाच्या या सणातून स्नेह,प्रेम,नाते वृध्दिँगत होते.

लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

११. राखी बांधून हातात

बहिण ओवळे भावाला..

भरुन साखर तोंडात

जीव लावेल भावाला...

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

१२. कुठल्याच नात्यात नसेल

एवढी ओढ आहे,

म्हणून भाऊ- बहिणीचं हे नातं

खूप खूप गोड आहे.

लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

१३. तूच माझा आधार तूच माझं सर्वस्व..

देवाचे आभार तुझ्या

रुपाने ताई मला दिला मोठा आधार,

ताई तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

१४. बंध हा प्रेमाचा नाव त्याचे राखी

बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती,

ओवळीते प्रेमाने,

उजळूनी दीप ज्योती

लाडक्या भावाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

१५. थोडी लढणारी थोडी भांडणारी

थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी

मस्ती करणारी एक बहीण असते

तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते

लाडक्या ताईला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

१६. आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण

कोणीच नसते नशीबवान असतात

ते ज्यांना बहीण असते

लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

१७. राखी एक प्रेमाची प्रतीक

आहे राखी एक विशास आहे

तुझ्या रक्षणार्थ सदैव

सज्ज असेन

हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या

पवित्र दिनी मी तुला देऊ इच्छितो.

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

१८. थोडी लढणारी, भांडणारी, चिडणारी

थोडी काळजी घेणारी मस्ती करणारी

एक बहीण असते तीच तर राखी

पौर्णिमेची खरी शान असते

लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

१९. काही नाती खूप अनमोल असतात,

हातातील राखी मला याची कायम,

आठवण करन देत राहील..

तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,

आणि आलंच तर त्याला आधी,

मला सामोरे जावे लागेल.

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

२०. तू बांधलेली राखी मी जीवापेक्षा जास्त जपतो

कारण जेव्हा तू जवळ नसते

त्यावेळी तुझ्या प्रेमाची ती

मला सतत आठवण करून देते

ताई तुला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS : मराठी असूनही ते एका मराठी मुलीलाच टार्गेट करत आहेत, मनसे नेत्याच्या मुलाकडून शिवीगाळ; इन्फ्लूएन्सरने सांगितली आपबिती

Maharashtra Live News Update रायगडच्‍या कोर्लई किनारयावरील संशयीत बोटीसंदर्भात महत्‍वपूर्ण खुलासा

Blood Pressure: ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी वरदान ठरेल 'ही' एक गोष्ट

Shocking News : महिला चेटकीण असल्याचा संशय; अंधश्रद्धेतून एकाच कुटुंबातील ५ जणांची हत्या

Nishikant Dubey: राज ठाकरेंना मराठी भाषा वादावरुन धमकी देणारे निशिकांत दुबे कोण?

SCROLL FOR NEXT