Priya More
बहीण-भावांच्या प्रेमाचे प्रतीक असलेला सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी भाऊ बहिणीला गिफ्ट देऊन खूश करतो.
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला काय गिफ्ट करावे असा प्रश्न भावांना नेहमी पडत असतो. त्यामुळे ते गॅजेटसह सौंदर्य प्रसाधने गिफ्ट करु शकता.
बहिणीच्या आवडीच्या रंगाचा डिझायनर ड्रेस किंवा डिझायनर साडी तुम्ही भेट म्हणून देऊ शकता.
मुलींना फॅशन करायला आवडते. त्यामुळे बहिणीला तुम्ही जिन्स, टॉप, स्कार्फ किंवा वनपीस गिफ्ट म्हणून देऊ शकता.
सध्या स्मार्ट वॉचचा ट्रेंड सुरु आहे. त्यामुळे तुम्ही रक्षाबंधनाला बहिणीला गिफ्ट म्हणून स्मार्टवॉच देऊ शकता.
मुलींना ज्वेलरी घालणं खूपच आवडतं. त्यामुळे तुम्ही रक्षाबंधननिमित्ताने बहिणीला अंगठी, कानातले, बांगड्या आणि पेंडंट असा ज्वेलरी सेट गिफ्ट म्हणून देऊ शकता.
मुलींना मेकअपची प्रचंड आवड असते. त्यामुळे तुम्ही बहिणीला चांगल्या ब्रँडची लिपस्टिक, कॉम्पॅटक्ट, फाऊंडेशन, परफ्यूम्स गिफ्ट म्हणून देऊ शकता.
बहिला गिफ्ट म्हणून देण्यासाठी हॅन्ड बॅग किंवा वॉलेट हा सुद्धा चांगला पर्याय आहे.
सध्या इअरबड्सचा चांगलाच ट्रेंड आहे. तुमच्या बहिणीला तुम्ही कोणत्याही चांगल्या ब्रँडचे इअरबड्स गिफ्ट म्हणून देऊ शकता.
तुमची बहीण लहान असेल तर तुम्ही तिला चॉकलेट्स किंवा कॅडबरी सेलिब्रेशन गिप्ट म्हणून देऊ शकता. लहान मुलांना चॉकलेट खूप आवडतात.