Priya More
रक्षाबंधन सण यावर्षी ३० ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. रक्षाबंधन निमित्ताने राख्यांनी बाजारपेठा सजल्या आहेत.
रक्षाबंधनाला भावाला राखी खरेदी करण्यासाठी बहिणींनी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी केली आहे.
राखी खरेदी करताना विशेष काळजी घेणं गरजेचे आहे. कारण आपण फॅशनच्या नावाखाली कोणत्याही रंगाची अथवा चिन्हाची राखी खरेदी करतो.
अशुभ चिन्ह आणि रंगाची राखी खरेदी केल्यास तुमच्या भावाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे राखी खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवा.
रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या मनगटावर काळ्या रंगाची राखी बांधू नका. काळ्या रंगाची राखी अशुभ मानली जाते.
काळ्या रंगासोबतच अशुभ चिन्ह असलेली राखी बांधणे टाळावे. यामुळे त्याला त्रास होऊ शकतो.
रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या मनगटावर देवांचे चित्र असलेली राखी बांधणे टाळावे.
रक्षाबंधनाला भावाला लाल आणि केशरी रंगाची राखी बांधणे शुभ मानले जाते. त्यामुळे तुम्ही या रंगाची निवड करु शकतो.