Raksha Bandhan Special SAAM TV
लाईफस्टाईल

Raksha Bandhan Special : यावर्षी रक्षाबंधन कोकणात करा सेलिब्रेट, अनुभवा डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

Konkan Travel : कोकणची माणसं साधी भोळी! यावर्षीची रक्षाबंधन निसर्गाच्या सान्निध्यात बहिणी भावांसोबत सेलिब्रेट करा. आपल्या कोकणाचे निसर्ग सौंदर्य अनुभवा.

Shreya Maskar

कोकण हे पर्यटनाचे प्रमुख ठिकाण आहे. पावसाळ्यात लोक येथे आवर्जून जातात. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनातून आपल्या प्रियजनांसोबत थोडा निवांत वेळ घालवण्यासाठी कोकण बेस्ट आहे.

कोकणाला सुरेख, लांब समुद्रकिनारा लाभला आहे. येथील सौंदर्य मनाला मोहून टाकते. कोकणात हिरवळ, खोल दऱ्या, धबधबे तुम्हाला पाहायला मिळतील. यंदा १९ ऑगस्टला रक्षाबंधन सण आला आहे. त्यामुळे आताच तुम्ही कोकणाचे तिकीट काढा आणि बहिणी भावांसोबत कोकणात रक्षाबंधनची मज्जा लुटा. कोकणातील ही निसर्गरम्य ठिकाण तुमचा रक्षाबंधन सण अविस्मरणीय करतील.

किहीम समुद्रकिनारा

अलिबागमध्ये असणारा किहीम समुद्रकिनाऱ्यावर निसर्गाचे अद्भुत सौंदर्य पाहायला मिळते. येथील पांढरी वाळू पर्यटकांचे आकर्षण आहे. हा स्वच्छ समुद्र किनारा आहे. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनातून काही क्षण निवांत घालवण्यासाठी या समुद्रकिनाराला आवर्जून भेट द्या.

आरे वारे बीच

रत्नागिरीतील आरे वारे बीच कोकणातील प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. हा शांत आणि स्वच्छ समुद्रकिनारा आहे. तुम्ही तुमच्या भावंडांसोबत इथे धमाल मस्ती करू शकता. आरे वारे बीच्या परिसरात उंच डोंगर आणि मध्ये लांब समुद्रकिनारा पाहायला मिळेल. पावसाळ्यात येथे पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.

मुरुड जंजिरा

मुरुड जंजिरा किल्ला अलिबाग जवळ येतो. हा किल्ला एका छोट्याशा बेटावर वसलेला आहे. येथून जवळ असलेल्या नवाब महालातही तुम्ही भेट देऊ शकता. संपूर्ण कुटुंबासोबत वीकेंडचा उत्तम प्लान येथे होऊ शकतो.

श्रीवर्धन

श्रीवर्धनचा समुद्रकिनारा पर्यटकांचे आकर्षण आहे. स्वच्छतेसाठी हा समुद्रकिनारा प्रसिद्ध ओळखला जातो. फेसाळलेल्या लाटांमधून भावंडांसोबत बालपणीच्या आठवणींना उजाळा देत सुंदर वेळ घालवा. या समुद्रकिनाऱ्यावर अद्भुत सूर्यास्ताचे निसर्ग सौंदर्य पाहायला मिळते.

तारकर्ली

तारकर्ली हे महाराष्ट्रातील पश्चिम भागात असलेले छोटेसे गाव आहे. तुम्ही रक्षाबंधनचा प्लान इथे हमखास करू शकता. हे गाव अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. तारकर्ली हे पांढऱ्या वाळूसाठी प्रसिद्ध आहे. साहसी क्रिया कलापांचा आनंद तुम्ही येथे घेऊ शकता. हा परिसर घनदाट जंगलांनी वेढलेला आहे. तर दक्षिणेला तारकर्ली नदी वाहते. येथे तुम्ही बोटिंगचा आनंद लुटता येतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT