Raksha Bandhan 2024 SAAM TV
लाईफस्टाईल

Raksha Bandhan 2024 : चिमुकल्यांचं पहिलं रक्षाबंधन होईल खास; आयुष्यभर राहील क्षण लक्षात, वाचा संपूर्ण प्लान

Children First Raksha Bandhan : तुमच्या मुलांची पहिली रक्षाबंधन अविस्मरणीय बनवण्यासाठी 'या' खास टिप्स ट्राय करा आणि मुलांच्या चेहऱ्यावर गोड हास्य घेऊन या.

Shreya Maskar

श्रावण महिना लागताच सणांना सुरुवात होते. भारतील सण प्रेमाचे आणि समर्पणाचे प्रतीक मानले जातात. यंदा १९ ऑगस्टला रक्षाबंधन सण आला आहे. रक्षाबंधन हा सण भाऊ- बहिणीच्या प्रेमाचा आणि आनंदाचा असतो. त्यात जर तुमच्या घरी चिमुकल्यांचं पहिलं रक्षाबंधन असेल तर दिवस खास झालाच पाहिजे. लहान मुलांचं रक्षाबंधन स्पेशल करण्यासाठी हा प्लान करा.

राखी

रक्षाबंधनला बहीण भावाला ओवाळते. गोडधोड खाऊ घालते. भावाच्या मनगटावर छान राखी बांधते. भावाला दीर्घायुष्य लाभावे याची प्रार्थना करते. ओवाळणीचे ताटात रंगीबेरंगी मिठाई ठेवा. लहान मुलांना रंग खूप आवडतात. ते रंगाकडे आकर्षित होतात. त्यामुळे गिफ्ट घेताना किंवा राखी खरेदी करताना रंगाकडे विशेष लक्ष द्यावे. मुलं लहान असतात. त्यामुळे राखी घेताना तिचा दर्जाची काळजी घ्या. कारण मुलाला ॲलर्जी होणार नाही याची काळजी घ्या. लहान भावासाठी त्यांच्या आवडीची कार्टून राखी मनगटावर बांधा. तसेच जर बहिण थोडी मोठी असेल तर घरातही सुंदर राखी बनवता येईल.

सणासुदीला मुलींना छान तयार करा

लहान मुलांना सण म्हटलं, की नवीन कपड्यांची उत्सुकता असते. त्यामुळे दोन्ही मुलांना छान पारंपारिक कपडे परिधान करून. सकाळी मस्त आंघोळ घालून नवीन कपडे घालायला द्या. तुमची मुलं खूप खुश होतील. मुलींला कपड्याला मॅचिंग ज्वेलरी घाला. थोडा हलका मेकअप करा. तुम्ही मुलांना त्या दिवशी सेम थीमचे कपडे घाला.

रक्षाबंधन गिफ्ट्स

रक्षाबंधन मध्ये भावाला राखीची उत्सुकता असते. कारण बहिणीला भावाकडून छान गिफ्ट मिळतं. पण जर तुमची मुलं लहान असतील तर पालकांनीच मुलीच्या आवडीचे गिफ्ट्स घेऊन यावे. मात्र त्या भेट वस्तूमधून मुलांचा विकास होईल याची काळजी घ्यावी. तुम्ही मुलीला खेळणी, गोष्टीची पुस्तके, चॉकलेट, दागिने , त्यांच्या आवडीचे कपडे गिफ्ट करू शकता. मुलं लहान असल्यामुळे जास्त महागातले गिफ्ट खरेदी करू नये. मुलांना आवडतील अशी छोटी गिफ्ट घावी. भावाने छोट्या बहिणीला गिफ्ट दिल्यावर तिचा आनंद द्विगुणित होईल. तुमचा मुलगाही लहान असेल तर या दिवशी त्याला ही छोट गिफ्ट घ्या.

आदर भावना

तुमची दोन्ही मुलं लहान असतील तर रक्षाबंधनच्या दिवशी मुलांना बहिण भावाच्या नात्यांचा आदर करायला शिकवा. कारण भावंड म्हटलं की, भांडण होणार, मात्र त्या पलिकडे जाऊन प्रेमाचं नातं जपायला हवं. ही भावना त्यांच्या मनात रुजवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Dome : वरळी डोममध्ये पाहणीदरम्यान संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांची गळाभेट | VIDEO

Vijay Melava Worli: वरळी डोममध्ये मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी, तेजस्विनी पंडितही मेळाव्यात सहभागी|VIDEO

Crime News : 'तो' व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; बदनामीच्या त्रासाला कंटाळून महिलेनं आयुष्य संपवलं

Worli History: 'वरळी' हे शहर कसे घडले? जाणून घ्या यामागचा रंजक इतिहास

SCROLL FOR NEXT