Raksha Bandhan Special SAAM TV
लाईफस्टाईल

Raksha Bandhan Special : लाडक्या भावासाठी १५ मिनिटांत बनवा 'नारळाची वडी', रक्षाबंधन होईल अधिक गोड, नोट करा रेसिपी

Coconut Barfi Recipe : रक्षाबंधनला भावाचं तोंड गोड करण्यासाठी बहिणीने घरीच अवघ्या १५ मिनिटांत नारळी बर्फी तयार करा. सिंपल रेसिपी नोट करा. तुमचा भाऊ खुश होईल.

Shreya Maskar

यंदा रक्षाबंधन सण १९ ऑगस्टला आहे. हा बहिण भावाच्या प्रेमाचा गोड दिवस आहे. या दिवशी भावाचे तोंड गोड करण्यासाठी झटपट नारळाची वडी बनवा. राखीपौर्णिमेला म्हणजेच नारळी पौर्णिमा होय. नारळी पौर्णिमा हा सण देशातील बऱ्याच भागात साजरा केला जातो. नारळी पौर्णिमेला नारळाचे खूप महत्त्व आहे. या दिवशी नारळाची पूजा करतात आणि समुद्रात सोन्याचा नारळ अर्पण करतात. नारळाचे विविध पदार्थ या दिवशी बनवले जातात. उदा. नारळाचा लाडू, नारळाची करंजी, नारळी भात, नारळाची वडी

रक्षाबंधनला भावाचे तोंड गोड करण्यासाठी झटपट नारळाची वडी बनवा.

नारळाची वडी

साहित्य

कृती

खोबऱ्याची वडी बनवण्यासाठी सर्वप्रथम खोबऱ्याचे छोटे तुकडे करून घ्या. त्यानंतर हे तुकडे मिक्सरला लावून छान वाटण करून घ्या. आता एका पॅनमध्ये साखर घालून पाणी टाका आणि सतत ढवळत रहा. चांगल्या नारळाच्या वडीसाठी साखरेचा पाक उत्तम होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे साखरेत जास्त पाणी घालू नये. साखर संपूर्ण विरघळ्या‌वर त्यात लिंबाचा रस घाला. आता गॅस मंद आचेवर ठेवून खोबऱ्याचा किस त्यामध्ये घाला. जोवर मिश्रण कोरडे होत नाही तोवर ते छान ढ‌वळत रहा. आता एका प्लेटला तूप लावून त्यामध्ये तयार केलेले मिश्रण हाताने थापून घ्या. मिश्रण गरम असताना सुरीच्या साहाय्याने वड्या कापून घ्या. वड्या सेट होण्यासाठी फ्रिजमध्ये एक ते दोन तास फ्रिजमध्ये ठेवा. यंदा रक्षाबंधनला राखी बांधून झाल्यावर भावाला गोड नारळाची वडी खाऊ घाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT