Railway Recruitment 2023  Saam Tv
लाईफस्टाईल

Railway Recruitment 2023 : गोल्डन चान्स! परीक्षेशिवाय मिळेल थेट नोकरी, रेल्वेत ३०९३ पदांसाठी भरती; कसा कराल अर्ज?

कोमल दामुद्रे

Railway Recruitment 2023 Online Application Process:

सरकारी खात्यात नोकरी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदीची बातमी आहे. आता परीक्षा न देता नोकरी भरतीची प्रक्रिया सुरु होणार आहे. उत्तर रेल्वेच्या रेल्वे रिक्रूटमेंट सेलने शिकाऊ पदांसाठी भरतीची जाहिरात जारी केली आहे.

या नोकरीसाठी (Job) ११ डिसेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. तर अर्जाची अंतिम तारीख १ जानेवारी २०२४ आहे. तसेच अर्ज करण्यासाठी rrcnr.org च्या अधिकृत वेबसाटला भेट देऊ शकता. तसेच अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने रेल्वने (Railway) जारी केलेली अधिसूचना वाचणे गरजेचे आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या पदांसाठी एकूण ३०९३ रिक्त जागा आहे. यासाठी पात्रता किती आणि निवड कशी केली जाईल तसेच वयोमर्यादा आहे हे जाणून घ्या.

1. पात्रता

अर्ज (Application) करणाऱ्या उमेदवाराला मान्यता प्राप्त बोर्डातून किमान ५० टक्के गुणांसह १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराने संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय केलेलं असावं. एनसीव्हीटीने जारी केलेल्या जाहीरातीत आयटीआय उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

2. वयोमर्यादा

उमेदवाराचे वय हे १५ ते २४ वर्ष दरम्यान असावे. तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्षांची सूट देण्यात आली आहे. एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवरांना ५ वर्षांची सूट देण्यात आली आहे.

3. अर्ज कसा कराल?

  • रेल्वे rrcnr.org च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

  • Apprentice Online Application लिंकवर क्लिक करा.

  • कागदपत्रे आणि पुढील प्रक्रिया पूर्ण करा.

4. अर्ज फी

सामान्य आणि ओबीसी श्रेणीसाठी अर्ज शुल्क १०० रुपये आहे. तर SC/ST/PWBD/महिला उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi : मोदींचा महाराष्ट्र दौरा; वर्ध्यातून संबोधित करणार

Supreme Court: सर्वात मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाचं अधिकृत यूट्यूब चॅनल हॅक

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

Kili Paul Dance : किली पॉलने भोजपुरी गाण्यावर धरला ठेका, 'लॉलीपाप लागेलू'वर जबरदस्त डान्स; हुकस्टेपने वेधलं लक्ष

Shahajibapu Patil : उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत; काळ्या दगडावरची पांढरी रेघ, ५० खोक्यांवरून शहाजीबापू खवळले

SCROLL FOR NEXT