Diwali 2025 saam tv
लाईफस्टाईल

Diwali 2025 Shubh Muhurt: दिवाळीच्या दिवशी कधीपर्यंत असणार राहूकाल? पूजा करण्यापूर्वी मुहूर्त जाणून घ्या

दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण आहे. या दिवशी धनाची देवी माता लक्ष्मी आणि बुद्धीचे देवता गणेशजी यांची पूजा केली जाते.

Surabhi Jayashree Jagdish

आज २० ऑक्टोबर २०२५ रोजी कार्तिक अमावस्या असल्याने दिवाळीचा पवित्र सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान गणेशाची विधीपूर्वक पूजा केली जाते. योग्य मुहूर्तात पूजा केल्यास घरामध्ये धन, धान्य, समाधान आणि सुखसमृद्धी वाढते, अशी श्रद्धा आहे. मात्र दिवाळीची पूजा करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक असतं.

पूजा अशुभ काळात म्हणजे भद्राकाल किंवा राहुकालात करू नये. त्यामुळे सर्वप्रथम हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की, या दिवशी भद्राकाल आणि राहुकाल कोणत्या वेळेत आहेत. वैदिक पंचांगानुसार, यंदा दिवाळीच्या दिवशी भद्रा आणि राहुकालाचं सावट तर असेल पण त्याचा पूजेवर कोणताही अडथळा येणार नाही. कारण भद्रा स्वर्गलोकात असेल आणि त्यामुळे पृथ्वीवरील दिवाळी पूजा बाधित होणार नाही.

दिवाळीवरील भद्राकाल कधी?

पंचांगानुसार, २० ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ०६:०८ ते सकाळी ०८:१५ पर्यंत भद्राकाल असेल. ही भद्रा स्वर्गात असल्याने पृथ्वीवरील शुभकार्यांवर तिचा परिणाम होणार नाही. त्यामुळे दिवाळी पूजा निर्भयपणे करता येणार आहे.

दिवाळीवरील राहुकाल कधी?

राहुकालही अशुभ मानला जातो आणि या काळात कोणतेही शुभ किंवा धार्मिक कार्य करू नये, अशी परंपरा आहे. पंचांगानुसार, २० ऑक्टोबर रोजी राहुकाल सकाळी ०७:५५ पासून सकाळी ०৯:२० पर्यंत असेल. त्यामुळे या काळात पूजा, हवन किंवा धार्मिक विधी टाळणे उत्तम.

दिवाळी पूजा करण्याचे शुभ मुहूर्त

यंदा दिवाळी पूजेसाठी तीन शुभ मुहूर्त उपलब्ध आहेत आणि हे सर्व अत्यंत मंगलकारी मानले जातात.

पहिला शुभ मुहूर्त- प्रदोष काल

२० ऑक्टोबर २०२५, सोमवार

संध्याकाळी ०५:४६ ते रात्री ०८:१८

दुसरा शुभ मुहूर्त - वृषभ काल

२० ऑक्टोबर २०२५, सोमवार

संध्याकाळी ०७:०८ ते रात्री ०९:०३

तिसरा आणि सर्वोच्च शुभ मुहूर्त – लक्ष्मी-गणेश पूजेसाठी सर्वात उत्तम वेळ

२० ऑक्टोबर २०२५, सोमवार

संध्याकाळी ०७:०८ ते रात्री ०८:१८

या मुहूर्तात १ तास ११ मिनिटे लाभदायक वेळ मिळतो, ज्यामध्ये लक्ष्मी-गणेशाची पूजा सर्वाधिक फलदायी मानली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eyebrow Care: आयब्रो डार्क दिसत नाहीत? मग नॅचरल टिप्स फॉलो करा काहीच दिवसात जाणवेल फरक

Moisturizer: जास्त मॉइश्चरायझर लावल्याने त्वचेवर काय परिणाम होतो?

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये खाजगी बस आणि एसटी बसचा अपघात

Bihar : बिहारच्या राजकारणाला धक्कादायक वळण; स्वबळावर लढण्याची घोषणा करणाऱ्या JMM ची निवडणुकीतूनच माघार

Parbhani Crime: जंगालात फिरणाऱ्या जोडप्याला ६ जणांनी घेरलं; तरुणासमोरच तरुणीवर सामूहिक अत्याचार, बलात्कारानंतर...

SCROLL FOR NEXT