ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
त्वचेसाठी मॉइश्चरायझर आवश्यक मानले जाते. यामुळे त्वचा हायड्रेट होते. परंतु असे म्हटले जाते की याचा वापर मर्यादित प्रमाणात केला पाहिजे.
जास्त मॉइश्चरायझर लावल्यास त्वचेवर काय परिणाम होतो, जाणून घ्या.
जास्त मॉइश्चरायझर वापरल्याने चेहरा चिकट वाटू शकतो, आणि मेकअप लूक खराब होऊ शकतो.
जास्त मॉइश्चरायझर वापरल्याल पोअर्स बंद होऊ शकतात, ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात.
जास्त प्रमाणात मॉइश्चरायझर लावण्याचा त्वचेवर जळजळ होऊ शकते. तसेच रॅशेज देखील होऊ शकतात.
जे लोक मॉइश्चरायझर जास्त प्रमाणात लावतात त्यांच्या त्वचेवर घाण जमा होऊ शकते.
त्वचेवर मॉइश्चरायझरचा जास्त वापर केल्याने त्वचा डिहायड्रेट होऊ शकते.