राधा अष्टमी २०२५ मध्ये १ सप्टेंबर रोजी साजरी होईल.
हा दिवस देवी राधेच्या जन्माचा पवित्र उत्सव आहे.
भक्त उपवास, पूजा, भजन-कीर्तन आणि आरती करतात.
बरसाणा, वृंदावन व मथुरा येथे भव्य उत्सव साजरा होतो.
श्रावण महिन्याच्या नंतर महाराष्ट्रात सगळ्या सणांना सुरुवात होते. मग रक्षाबंधन, नागपंचमी, गोकुळाष्टमी, गणपती असे सण येतात. त्यातच सप्टेंबरमध्ये राधा अष्टमीसुद्धा येते. पुढे आपण तारिख, मुहूर्त आणि राधा अष्टमी कुठे कशी साजरी केली जाते हे जाणून घेणार आहोत.
राधा अष्टमी २०२५ तारिख आणि मुहूर्त
राधा अष्टमी २०२५ मध्ये १ सप्टेंबर रोजी मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाणार आहे. यंदा अष्टमी तिथी सकाळी १२:५७ वाजता संपेल. चंद्र गणना आणि स्थानानुसार तिथीची गणना थोडी बदलू शकते. हिंदू चांद्र दिनदर्शिकेनुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला राधा अष्टमी साजरी केली जाते. भगवान श्रीकृष्णाची प्रिय पत्नी आणि वैष्णव संप्रदायात सर्वोच्च आदराचे स्थान असलेली देवी राधा ही शुद्ध भक्ती आणि दिव्य प्रेमाचे प्रतीक मानली जाते. हा सण ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात येतो आणि देशभरात उत्साहात साजरा होतो.
राधा अष्टमीला पूजा केल्याने होणारे लाभ काय?
भक्तांच्या मते या दिवशी राधेची भक्तिपूर्वक पूजा केल्याने आध्यात्मिक उन्नती, वैवाहिक जीवनातील सौख्य आणि मनोकामना पूर्ण होण्याचे आशीर्वाद मिळतात. राधा अष्टमीच्या दिवशी अनेक भक्त उपवास पाळतात आणि पूजा होईपर्यंत फक्त फळे आणि पाणी ग्रहण करतात. दुपारचा काळ राधेच्या जन्माचा शुभमुहूर्त मानला जातो, त्यामुळे मध्याह्न काळात विशेष पूजा आणि आरती केली जाते. मंदिरांमध्ये आणि घरी भजन, कीर्तन आणि कृष्ण-राधेच्या स्तुतीतील भक्तिगीते गुंजत असतात. अनेक ठिकाणी राधा-कृष्णांच्या मूर्तींना फुलांनी, दागिन्यांनी आणि रंगीबेरंगी वस्त्रांनी सजवले जाते आणि भव्य मिरवणुका काढल्या जातात.
राधा अष्टमी कुठे साजरी केली जाते?
बरसाणा, वृंदावन आणि मथुरा येथे या सणाचा उत्साह अधिकच असतो. राधेच्या जन्मभूमी बरसाणामध्ये हजारो भक्त एकत्र येतात आणि दिवसभर धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक सादरीकरणे आणि सामूहिक प्रसाद वितरणात सहभागी होतात. वृंदावनातील इस्कॉन मंदिरात विशेष प्रार्थना, प्रवचन आणि कीर्तनाचे आयोजन केले जाते.
मंदिरांच्या आवारात फुलांनी सजावट केली जाते आणि भक्तांसाठी भव्य प्रसादाची मेजवानी ठेवली जाते. मथुरा येथेही राधा अष्टमीच्या दिवशी रस्त्यांवर तिरंगी आणि रंगीबेरंगी पताका फडकवल्या जातात, बाजारपेठा उजळून निघतात आणि धार्मिक वातावरणात भक्तीची लहर पसरते. हा दिवस केवळ धार्मिक महत्त्वाचा नसून भक्तांना त्यांच्या आध्यात्मिक प्रवासात नवा उर्जा आणि प्रेरणा देणारा मानला जातो. राधेचे जीवन, तिची कृष्णावरील निष्ठा आणि प्रेम यांची स्मृती मनात बाळगत भक्त हा सण श्रद्धा, उत्साह आणि भक्तिभावाने साजरा करतात.
राधा अष्टमी २०२५ कधी आहे?
राधा अष्टमी २०२५, १ सप्टेंबर रोजी साजरी होईल.
राधा अष्टमीचा धार्मिक महत्त्व काय आहे?
हा दिवस राधेच्या जन्माचा उत्सव आहे. भक्ती, प्रेम आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी हा अत्यंत पवित्र मानला जातो.
राधा अष्टमीला कोणते विधी केले जातात?
उपवास, पूजा, भजन-कीर्तन, राधा-कृष्ण मूर्तींची सजावट आणि आरती केली जाते.
राधा अष्टमी कोणत्या ठिकाणी विशेष साजरी केली जाते?
बरसाणा, वृंदावन, मथुरा आणि देशातील इस्कॉन मंदिरे येथे मोठ्या उत्साहात हा सण साजरा होतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.