Causes pus in the liver saam tv
लाईफस्टाईल

यकृतामध्ये पू होणं 'या' गंभीर आजारांचे संकेत; अवयवाच्या चारही बाजूंना बनतात गाठी

Causes pus in the liver : यकृतामध्ये फोड आल्याने ही समस्या निर्माण होते. प्रामुख्याने जिवाणू आणि अमीबिक असू शकतो. यकृताच्या फोडामुळे शरीरात पोटदुखी, लघवीचा रंग बदलणं, भूक न लागणे इत्यादी अनेक लक्षणं दिसतात.

Surabhi Jayashree Jagdish

एखादी जखम झाली की काही वेळा त्यामध्ये पस म्हणजेच सामान्य मराठी भाषेत पू निर्माण होतो. मात्र तुम्हाला माहितीये का तुमच्या लिवरमध्ये देखील पस होण्याची शक्यता असते. लिवर म्हणजेच यकृतामध्ये पू होण्याच्या अवस्थेला लिव्हर ऍबसेस म्हणतात. हे यकृतातील संसर्गामुळे होऊ शकते.

यकृतामध्ये फोड आल्याने ही समस्या निर्माण होते. प्रामुख्याने जिवाणू आणि अमीबिक असू शकतो. यकृताच्या फोडामुळे शरीरात पोटदुखी, लघवीचा रंग बदलणं, भूक न लागणे इत्यादी अनेक लक्षणं दिसतात. या लक्षणांकडे जास्त काळ दुर्लक्ष करू नये. कारण या स्थितीकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास हळूहळू ही स्थिती बिघडू शकते. यकृतामध्ये पू तयार होण्यास अनेक घटक कारणीभूत असतात. चला जाणून घेऊया यकृतामध्ये पस होण्याची कारणं कोणती आहेत?

यकृतामध्ये पस होण्याची कारणं

अपेंडिक्स फुटल्यामुळे बॅक्टेरियाचा प्रसार

अनेक वेळा अपेंडिक्स फुटतं, त्यामुळे यकृताभोवती बॅक्टेरिया पसरतात. या स्थितीत यकृताभोवती फोड तयार होऊ लागतात. जर तुम्हाला अपेंडिक्सची समस्या असेल तर एकदा तपासणी करून घ्या.

स्वादुपिंडाचा कॅन्सर

स्वादुपिंडाचा कॅन्सर असेल तर यकृतामध्ये पस होण्याचे कारण देखील असू शकतात. जर तुम्हाला यकृतामध्ये पस होण्याची लक्षणं दिसत असतील तर अशा परिस्थितीत ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

कोलन कॅन्सर

यकृतामध्ये फोड तयार होण्याचं कारण कोलन कॅन्सर देखील असू शकतं. कोलन कॅन्सर झाल्यास यकृतावर परिणाम होऊ शकतो. अशावेळी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

ब्लड इन्फेक्शन

यकृताचा फोड तयार होण्यामागे ब्लड इन्फेक्शन किंवा सेप्टिसीमिया हे कारण असू शकतं. म्हणून या स्थितीकडे कधीही दुर्लक्ष करू नका. हळूहळू गंभीर समस्या निर्माण होऊ शकते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

SCROLL FOR NEXT