Holi 2024, Holi Colors Benefits On Mental Health Saam tv
लाईफस्टाईल

Holi 2024 : मानसिक तणाव दूर करतील होळीचे रंग, फायदे वाचा!

Holi Colors Benefits On Mental Health : रंग किंवा पाण्यात भिजणे नकोसे वाटते. तज्ज्ञांच्या मते होळीचे रंग खेळल्याने मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतात.

कोमल दामुद्रे

Psychological effects of Holi Colors :

होळी हा अनेक रंगांचा सण. यंदा होळीचा सण हा २४ मार्चला साजरा केला जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण केली जाते. गुलाल आणि पाण्याने खेळला जाणारा हा सण.

डीजे, थंडाई, भांग, गोडाचे पदार्थ यामुळे होळीच्या सणाला एक वेगळे रुप मिळते. अनेकांना होळी खेळायला आवडत नाही. रंग किंवा पाण्यात भिजणे नकोसे वाटते. तज्ज्ञांच्या मते होळीचे रंग खेळल्याने मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतात. तसेच मानसिक स्वास्थ्य सुधारते. होळ्याच्या रंगांचा मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो जाणून घेऊया.

1. तणावापासून मुक्ती

होळीच्या (holi Festival) सणामध्ये आजूबाजूचे वातावरण प्रसन्न होते. गुलालाचे रंगीबेरंगी रंग, डीजे यामुळे मूड चांगला होतो. होळीसारख्या सणाच्या दिवशी मित्र आणि नातेवाईकांसोबत होळी खेळल्याने स्ट्रेस (Stress) कमी होऊन मूड सुधारतो.

2. हॅप्पी हार्मोन्स

रंग खेळणे, विविध गोडाचे पदार्थ खाणे आणि आपल्या प्रिय व्यक्तींना भेटल्यानंतर शरीरातून आनंदी सप्रेरके बाहेर पडतात. तसेच मानसिक आरोग्य (Mental Health) सुधारते.

3. कलर थेरपी

होळीच्या रंगाचा मनावर चांगला परिणाम होतो. कलर थेरपीनुसार वेगवेगळ्या रंगाचा आपल्या मनावर वेगवेगळा प्रभाव पडतो. हिरवा आणि निळा रंग मन शांत करते. केशरी रंग आनंद वाढवतात. लाल, गुलाबी, पिवळा यांसारखे रंग आपल्या भावना प्रकट करतात.

4. एकटेपणा दूर होतो

अनेकजण होळीचा सण आपल्या कुटुंबासह नातेवाईक आणि मित्रांसोबत साजरा करतात. त्यामुळे त्यांचे नाते अधिक घट्ट होते. भेटणे आणि बोलण्यामुळे मन शांत होते. ताणतणाव कमी होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अंबरनाथमध्ये भाजप-अजितदादा गटाची युती होणार?

लाडक्या बहीण'साठी आनंदाची बातमी, काही तासात खात्यावर ₹१५०० येणार

Nankhatai Recipe : दिवाळीत लहान मुलांसाठी खास बनवा खुसखुशीत नानकटाई, तोंडात टाकताच विरघळेल

Katrina Kaif Pregnancy : "मुलगा असेल की मुलगी असेल गं?" कतरिना कैफच्या प्रेग्नेंसी बद्दल ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी

Pune : पुण्यात खळबळ! शरद पवारांच्या आमदाराविरोधात गुन्हा, कारण काय?

SCROLL FOR NEXT