लाईफस्टाईल

Healthy Breakfast Without Eggs: हेल्दी नाश्त्यात फक्त अंडीच कशाला? या ४ घरगुती पदार्थातून मिळेल भरपूर प्रोटीन, एकदा ट्राय कराच!

Protein Breakfast For Weight Loss And Stamina, Energy : फिट राहण्यासाठी अंडीच खाण्याची गरज नाही. मूग डाळ चिल्ला, बेसन चिल्ला, पनीर भुर्जी, अंकुरलेले मूग आणि अडई डोसा हे घरगुती पदार्थ भरपूर प्रोटीन देतात आणि बजेटमध्ये बसतात.

Sakshi Sunil Jadhav

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये लोक फीटनेसला खूप महत्व देत आहेत. माणसाला आपली आवडती गोष्ट करायची असेल तर माणूस पैशांचा विचार करत नाही. विशेषत: तरुण मंडळींना फिटनेस रुटीन फॉलो करायला आवडतं. मग त्यासाठी हे लोक महागड्या जीम लावलात, पर्सनल ट्रेनर ठेवतात. चांगलं डाएट फॉलो करतात. पण बऱ्याचदा फीट राहण्यासाठी लोक अंडी हाच पर्याय निवडतात. पण घरात असे काही पदार्थ आहेत. ज्याने तुम्हाला भरपूर प्रोटीन मिळेल आणि त्यासाठी लोकांना जास्त खर्चही करावा लागणार नाही.

प्रत्येकाच्या घरात डाळी, कडधान्ये, दूध, दही, ताक आणि इतर आंबवलेल्या पिठापासून बनणारे नाश्ते तयार केले जातात. हे तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रोटीन देणारे पदार्थ आहेत. सरासरी प्रौढ व्यक्तींना दररोज शरीराच्या वजनाच्या प्रति किलोमागे सुमारे ०.८ ते १ ग्रॅम प्रोटीनची गरज असते. म्हणजेच ६० ते ७० किलो वजन असलेल्या माणसाला साधारण ४८ ते ७० ग्रॅम प्रोटीन दिवसात विभागून घेणं महत्वाचं असतं.

मूग डाळीचा चिल्ला हा असा एक पारंपरिक आणि प्रोटीनने भरलेला पर्याय आहे. यामध्ये आलं-लसूण, हिरवी मिरची आणि हलके मसाले वापरले जातात. हा हलका नाश्ता असतो. १४ ते १६ ग्रॅम प्रोटीन तुम्हाला यातून मिळू शकतं.

बेसन चिल्ला सुद्धा सकाळसाठी बेस्ट ऑप्शन आहे. हरभऱ्याच्या पिठात कांदा, टोमॅटो, पालक आणि मसाले घालून तयार केलेला हा पॅनकेकसारखा १२ ते १४ ग्रॅम प्रोटीन देतो. दह्यासोबत किंवा पनीर भरून खाल्ल्याने त्यातीले प्रोटीनचे प्रमाण आणखी वाढते.

पनीर भुर्जी आणि मल्टीग्रेन रोटी हा प्रोटीनसाठी बेस्ट आहे. कांदा-टोमॅटो मसाल्यात परतलेले ताजे पनीर १८ ते २० ग्रॅमपर्यंत प्रोटीन देऊ शकते. यासोबत मल्टीग्रेन रोटी किंवा होल ग्रेन ब्रेड घेतल्याने नाश्ता जास्त हेल्दी होतो.

मूग सॅलड किंवा उसळ ही हलकी आणि प्रोटीन डीश आहे. रात्री भिजवलेले अंकुरआलेले मूग हलक्या फोडणीत परतून किंवा लिंबू आणि मसाल्यासोबत खाल्ले जाऊ शकतात. एका बाउलमध्ये सुमारे १४ ते १५ ग्रॅम प्रोटीन मिळतं.

अडई डोसा म्हणजे विविध डाळींचे एकत्रित मिश्रण. तूर डाळ, चणा डाळ, उडीद डाळ आणि थोडा तांदूळ भिजवून तयार केलेल्या पिठाचा जाडसर डोसा बनवला जातो. दोन डोश्यांमध्ये साधारण १६ ते १८ ग्रॅम प्रोटीन मिळतं.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT