Spinach Paneer Toast Recipe: पिझ्झा-बर्गर विसरून जाल! मुलांसाठी बनवा सुपर हेल्दी क्रिस्पी पालक पनीर टोस्ट; रेसिपी आहे एकदम सोपी

Sakshi Sunil Jadhav

पालक न आवडती भाजी

पालक खाताना लहान मुलं नाक मुरडतात. पण तुम्ही त्यांच्या आवडीनुसार एका वेगळ्या आणि खास पद्धतीने पालक खायला देऊ शकता.

Spinach Paneer Toast Recipe

रेसिपीचे नाव

तुम्ही घरच्या घरी क्रिस्पी पालक आणि पनीर टोस्ट रेसिपी बनवून तुमच्या फॅमिलीला खुश करु शकता. ही रेसिपी अत्यंत सोपी आणि साधी आहे.

spinach paneer toast | google

रेसिपीचे साहित्य

4 ब्राउन ब्रेड टोस्ट केलेले, ३ कप उकडवलेली पालक, १ वाटी मॅश केलेले पनीर, १ चमचा मेयोनिज, २ हिरव्या मिरच्या, मीठ, काळी मिरी इ.

easy tiffin recipes

स्टफिंग तयार करण्याची पद्धत

एका भांड्यात मॅश केलेले पनीर, उकडलेली पालक, मेयोनिज, हिरव्या मिरच्या, मीठ आणि काळी मिरी घालून सर्व मिश्रण चांगले एकजीव करा.

easy tiffin recipes

टोस्ट तयार करण्याची कृती

ब्रेड स्लाइसवर तयार स्टफिंग समान पसरवा. त्यावर दुसरा ब्रेड स्लाइस ठेवून हलकेच दाबा.

healthy breakfast for kids

कुरकुरीत बनवण्याची ट्रिक

तव्यावर बटर किंवा तूप गरम करून तयार टोस्ट दोन्ही बाजूंनी सोनेरी व कुरकुरीत होईपर्यंत भाजा. मध्यम आचेवर भाजल्याने टोस्ट जास्त क्रिस्पी होतात.

spinach paneer toast

सर्व्हिंग आयडिया

गरमागरम टोस्ट टोमॅटो सॉस किंवा ग्रीन चटणीसोबत सर्व्ह करा. वरून थोडा चाट मसाला टाता. त्याने चव वाढते.

spinach paneer toast

किती वेळ लागतो?

ही रेसिपी फक्त १५ ते २० मिनिटांत तयार होते. शाळेच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय आहे.

spinach paneer toast

NEXT: चेहरा तिशीतच निस्तेज झालाय? किचनमधल्या या पदार्थांचा वापर करा, लगेच होईल ग्लोईंग त्वचा

Skin Care
येथे क्लिक करा